Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*’द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न, वास्तवता दाखवणाऱ्या गाण्यांची चर्चा*

 *"द महाराष्ट्र फाईल्स" चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न, कलाकार आणि गायकांनी वाढविली कार्यक्रमाची शोभा*


*’द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न, वास्तवता दाखवणाऱ्या गाण्यांची चर्चा*

*’द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाच्या म्युझिक लाँचला गाण्याच्या हुकस्टेपवर धरला कलाकार, गायक आणि उपस्थितांनी ठेका, सर्वत्र चर्चा* 





शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष यावर आधारित बहुचर्चित चित्रपट "द महाराष्ट्र फाईल्स" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने चित्रपटाची बाजू उंचावली आहे पण आता चित्रपटाच्या झालेल्या भव्य म्युझिक लॉंच सोहळ्याने हा चित्रपट भलताच चर्चेत आला आहे. चित्रपटातील सगळ्याच गाण्यांचा आशय हा वास्तवाशी जोडलेला असून समाजातील अन्याय, शोषण आणि न्यायासाठीचा संघर्ष या विषयांना यातून प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. तर या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यासाठी गायकांचीही उपस्थिती विशेष ठरली. नितीन सावंत, अजित, सिद्धार्थ कश्यप, अजय गोगावले, आनंद शिंदे, वैशाली म्हाडे, राजा हसन ही गायनक्षेत्रातील मंडळी हजर होती. 


चित्रपटातील ‘मार तू शिक्का’ या गाण्याच्या प्रदर्शनावेळी सपना चौधरीने हुकस्टेपवर ठेका धरला. या गाण्याचे बोल सुशील राठोड, विनायक पवार, दिपक अंगेवार यांचे आहेत. तर संगीतकार म्हणून नितीन सावंत, अंबरीश यांनी बाजू सांभाळली आहे. तर हे गाणं आनंद शिंदे, अंबरीश आणि वैशाली माडे यांनी गायलं आहे. तर चित्रपटातील 'मन पाखरू' हे गाणं गुरु ठाकूर यांनी लिहिलं असून संगीताची बाजू नितीन सावंत यांनी सांभाळली. गायक अजय गोगावले यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात हे गाणं स्वरबद्ध केलं. नृत्यांगना गौतमी पाटीलवर चित्रित झालेलं 'छम्मो' हे गाणं सखील आझमी यांनी लिहिलं असून संगीतकार सिद्धार्थ कश्यपने संगीतबद्ध केलं आहे. आणि साक्षी होळकर आणि राजा हसन यांनी त्यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध केलं आहे. 'कती तू बंजारा' हे गाणं डॉ. गीतकुमार पवार यांनी लिहिलं असून शालिनी राठोड आणि राजा हसन यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात गायलं आहे. तर सनी लिओनीवर चित्रित झालेल्या 'शांताबाई' गाण्याची भलतीच चर्चा रंगली. हे गाणं संजय लोंढे यांनी गायलं आहे. 





चित्रपटाच्या भव्य संगीत अनावरण सोहळ्याला गायन क्षेत्रातील दिग्गजांसह दमदार स्टारकास्ट उपस्थित असल्याचं दिसलं. मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, गौतमी पाटील, सपना चौधरी, नागेश भोसले, सयाजी शिंदे या दिग्गज मंडळींनी कार्यक्रमाला चारचाँद लावले. दिग्दर्शक, निर्माते संजीवकुमार राठोड यांचीही उपस्थिती होती. चित्रपटाच्या म्युझिक लॉंचला अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी चित्रपटातील कामाचा आणि भूमिकेच्या निवडीचा अनुभव सांगितला.


चित्रपटाचे संगीत प्रेक्षकांना भावनिक आणि वास्तववादी अनुभव देणारे असून प्रत्येक गाण्यामध्ये समाजाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन अजित, संजय लोंढे, सिद्धार्थ कश्यप, डॉ. गीतकुमार पवार यांनी उत्तमरित्या सांभाळत वास्तवता हुबेहूब मांडली आहे. या भव्य संगीत अनावरण सोहळ्याला कलाकार आणि गायकांच्या परफॉर्मन्सनेही शोभा वाढविली. येत्या २९ मे २०२६ ला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.