Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*ज्योती करणार स्वराजची 'वर चाचणी' तर सुलु आत्या घेणार प्रीतीची 'वधू परीक्षा'?*

*ज्योती करणार स्वराजची 'वर चाचणी' तर सुलु आत्या घेणार प्रीतीची 'वधू परीक्षा'?*

*'दीपज्योती' मालिकेत नात्यांचा नवा खेळ!*


*'दीपज्योती'* ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेचा वेगवान प्रवास, कलाकारांचा सहज अभिनय आणि गुंतवून ठेवणारी पटकथा यामुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान भक्कम केले आहे. प्रेक्षकांमध्ये यापुढील कथानकाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. येणाऱ्या आठवड्यांमध्ये ही मालिका एका अत्यंत मनोरंजक आणि भावनिक वळणावर येणार आहे. जिथे नात्यांची नवी परीक्षा आणि संघर्षाची ठिणगी पाहायला मिळणार आहे.




मालिकेच्या आगामी भागात, दीप आणि ज्योती यांच्यातील अनोखं नातं एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येईल. ज्योतीच रक्षण करण्यासाठी दीप चक्क वेशांतर करून, येणार आहे. दीपाचे हे वागणे ज्योतीला बेजबाबदारपणाचे वाटून त्यांच्यात वादाची ठिणगी पडणार आहे. दुसरीकडे, स्वराज आणि प्रीतीच्या लग्नाची बोलणी सुरू असतानाच, ज्योती स्वराजची 'वर चाचणी' घेणार आहे. तर सुलू आत्या प्रीतीची *'वधू चाचणी'* घेणार आहे. आता ही वधू वर चाचणी काय असेल हे बघणं औसुक्याच असणार आहे. तणावपूर्ण वातावरणात साखरपुड्याची बोलणी सुरू होणार आहेत. 




*हा हाय-व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवणारा ठरेल. तेव्हा पाहायला विसरू नका, 'दीपज्योती', दररोज रात्री ८.३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.