Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*काय होणार जेव्हा विश्वंभर समोर श्रावणी देणार आपल्या प्रेमाची कबुली !*

*काय होणार जेव्हा विश्वंभर समोर श्रावणी देणार आपल्या  प्रेमाची कबुली !*




झी मराठीवरील लोकप्रिय मालिका *'शुभ श्रावणी'* सध्या उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली असून प्रेक्षकांना दररोज नवनवीन धक्के पाहायला मिळत आहेत. मालिकेचं कथानक आता अशा टप्प्यावर आले आहे, जिथे श्रावणीचे प्राण वाचवण्यासाठी नियती स्वतः खेळ खेळताना दिसणार आहे. मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत, श्रावणीची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला तातडीने दुर्मिळ अशा 'ब्लड ग्रुप'ची गरज भासते. अशा कठीण समयी, श्रावणीने भूतकाळात ज्या गरीब महिलेला मदत केली होती, ती महिला मदतीसाठी धावून येणार आहे. 




तर दुसरीकडे, कथानकात एक अनपेक्षित वळण येणार आहे. जेलमधून पळालेली वैशाली मृत अवस्थेत आढळते. या घटनेमुळे रुद्र प्रचंड संतापला असून विश्वंभर पूर्णपणे कोलमडून गेला आहे. श्रावणी आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना, शुभ भावूक होऊन तिच्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली देतो. प्रकृती सुधारत असताना शुभ आणि श्रावणी एकमेकांच्या अधिक जवळ येणार आहेत. रुग्णालयातून घरी परतल्यावर श्रावणी आपल्या वडिलांना सुबुबद्दल सांगण्याचे ठरवते. मात्र, तिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावत विश्वंभर श्रावणीचं रुद्रवर प्रेम असल्याचं समजतात, या मोठ्या गैरसमजामुळे नात्यांमध्ये एक नवीनच पेच निर्माण होणार आहे.


*नात्यांचा हा गुंता आणि श्रावणीच्या आयुष्यातील हा नवा संघर्ष प्रेक्षकांसाठी नक्कीच खिळवून ठेवणारा ठरेल. तेव्हा  'शुभ श्रावणी'चे आगामी भाग पाहायला विसरू नका, दररोज संध्या ६:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.