*ZEE5 वरील ‘अंधा प्यार 2.0’ मध्ये झळकलेला अभिनेता पवन चौरे ‘पिक्चर बॉईज’मधून थिएटरमध्ये झळकणार!!*
अभिनय क्षेत्रात हिरो होण्याचं स्वप्न हे प्रत्येकाचं असत. परंतु प्रत्येकालाच हे स्वप्न पूर्ण करता येईल हे अजिबात सांगता येत नाही. एका खेड्यातून येऊन मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एका तरुणाने त्याचे स्वप्न हे प्रत्यक्षात उतरवले आहे. ‘ZEE5 वरील अंधा प्यार 2.0’ या वेबसिरीज मधून घराघरात पोहचलेला अभिनेता पवन चौरे आता रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे. येत्या १५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या "पिक्चर बॉईज’ या चित्रपटात आपल्याला त्याची महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.
त्रिमूर्ती फिल्म्सनं 'पिक्चर बॉईज' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार, राजा पांडुरंग पंडितपवार हे या चित्रपटाचे निर्माते असून शिवाजी केशव पाटील हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन निलेशसिंह राजपूत यांनी केलं आहे.
एका खेड्यातून आलेल्या तरुणासाठी हा प्रवास खूप अभिमानास्पद आहे. माझ्या कुटुंबाचा, मित्रांचा आणि प्रेक्षकांचा पाठिंबा नसता तर हे शक्य झालं नसतं.
मला माझं नाव खूप मोठं करायचं आहे. म्हणतात ना, स्वप्न पाहिली की ती नक्की पूर्ण होतात—आणि मी माझी स्वप्नं नक्की पूर्ण करणार. आगामी काळातही प्रेक्षकांचे असेच प्रेम आणि आशीर्वाद मिळत राहतील, अशी अपेक्षा असल्याचे अभिनेता पवन याने सांगितले.
अभिनयाबरोबरच मी कलरीपयट्टू, जिम्नॅस्टिक्स आणि कुस्ती यांसारख्या कला देखील शिकत आहे. या नव्या गोष्टी स्वतःमध्ये आत्मसात करताना मला खूप अभिमान वाटतो आणि त्याचा मला माझ्या कामातही फायदा होत आहे असे त्याने आवर्जून सांगितले.


