Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या 'पिक्चर बॉईज'चा धमाकेदार टीझर लाँच*

*कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या 'पिक्चर बॉईज'चा धमाकेदार टीझर लाँच*

*निलेशसिंह राजपूत दिग्दर्शित यंग ब्रिगेडचा 'पिक्चर बॉईज' १५ मे पासून थिएटरमध्ये धुमाकूळ घालणार*

*हिरो होण्यासाठी धडपडणाऱ्या दोन तरूणांची धमाल गोष्ट "पिक्चर बॉईज"*


उन्हाळ्याच्या सुटीत कॉमेडीचा सुखद अनुभव देणाऱ्या पिक्चर बॉईज या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. १५ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, चित्रपटांमध्ये हिरो होण्यासाठी धडपडणाऱ्या दोन तरूणांची धमाल गोष्ट या चित्रपटात पाहता येणार आहे.



त्रिमूर्ती फिल्म्सनं 'पिक्चर बॉईज' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार, राजा पांडुरंग पंडितपवार हे या चित्रपटाचे निर्माते असून शिवाजी केशव पाटील हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन निलेशसिंह राजपूत यांनी केलं आहे. मंदार चोळकर, सुनील दोडगे, संध्या-प्रनिकेत यांनी लिहिलेल्या गीतांना वरुण लिखाते आणि संध्या-प्रनिकेत यांनी संगीतबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते, एल. के. लक्ष्मीकांत यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. विनोद पाटील यांनी छायांकन, रोहन पाटील यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.  आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले,  वरुण लिखाते, एल. के. लक्ष्मीकांत यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख, पवन चुरे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), प्रिया तुळजापूरकर, सूरज पाटील, किरण पाटील, नम्रता पोटे, निभिया शर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, प्रशांत तपस्वी, मिलिंद दास्ताने, विजय खंदारे, साक्षी पंडितपवार, विजय गिते, अंकिता राऊत अशी नव्या जुन्या कलाकांची फळी चित्रपटात आहे. 


"पिक्चर बॉईज" या चित्रपटातून एक धमाल गोष्ट मांडण्यात आली आहे. चित्रपट क्षेत्राची फारशी काही माहिती नसलेल्या दोन तरुणांना हिरो व्हायचं असतं. चित्रपटाच्या क्षेत्रात आल्यानंतर त्यांच्या वाट्याला काय काय अनुभव येतात, त्यातून काय धमाल विनोदी प्रसंग घडतात याचं कथानक चित्रपटात मांडण्यात आलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधूनही त्याची झलक मिळत आहे. त्यामुळेच चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. मजेशीर कथानक, उत्तम लेखन, ताल धरायला लावणारं संगीत, दमदार अभिनय हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.  उन्हाळ्याच्या सुटीत पुरेपूर मनोरंजन करणारा पिक्चर बॉईज हा चित्रपट सहकुटुंब चित्रपटगृहात जाऊनच पाहावा लागणार आहे.



*Teaser Link*

https://youtu.be/yZsR-_U-9S4


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.