Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*झी मराठीची प्रेक्षकांसाठी खास मेजवानी! ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’*

*झी मराठीची प्रेक्षकांसाठी खास मेजवानी! ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’*

*‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ फक्त झी मराठीवर!*




प्रेक्षकांची लाडकी झी मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार कार्यक्रम घेऊन येते. आणि म्हणून प्रेक्षकांच एक्सट्रा मनोरंजन व्हावं  यासाठी झी मराठी घेऊन येत आहे *‘आपली दुपार’* आणि *‘मनोरंजनाचा Powerplay’.* प्रेक्षकांच्या प्रेमाला प्रतिसाद देत झी मराठी नेहमीच अपेक्षेपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्या मनातील जिव्हाळा जपण्यासाठी सातत्याने पुढाकार घेत आहे.


*१३ एप्रिलपासून दररोज दुपारी १ ते ३ या वेळेत* घरातील जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असणाऱ्या महिलांसाठी हा वेळ खास ठरणार आहे. दिवसातील थोडा वेळ स्वतःसाठी राखून आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद घेण्याची ही उत्तम संधी आहे. या विशेष सत्रात *'सावळ्याची जणू सावली', 'लक्ष्मी निवास',  आणि 'आम्ही सारे खवय्ये'*  या लोकप्रिय कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत बालकलाकार साईराज केंद्रे याची दमदार एंट्री होणार आहे. या नव्या वळणामुळे मालिकेची कथा अधिक उत्कंठावर्धक ठरणार असून पुढे कथानक कोणते नवे वळण घेणार याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे.





यासोबतच *‘मनोरंजनाचा Powerplay’,* च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांना आणखी रोमांचक बनवणार आहे. या मनोरंजनाच्या Powerplay मध्ये ' *शुभ श्रावणी' , 'वीण दोघातली ही तुटेना', 'तारिणी' आणि 'देवमाणूस- मधला अध्याय' या मालिका आता ३० मिनिटांऐवजी ४५ मिनिटांच्या असणार आहेत* . या ‘एक्स्ट्रा इनिंग्स’मुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकांचा एक्स्ट्रा आनंद घेता येणार आहे. 

 

*तेव्हा आनंद, उत्कंठा आणि भावनांनी परिपूर्ण अशा मनोरंजनाचा आस्वाद घ्यायला विसरू नका ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ १३ एप्रिलपासून फक्त आपल्या झी मराठीवर!*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.