*महिला कुटुंब चालकांच्या उपस्थिती
त पार पडली ‘दीपज्योती’ची भावस्पर्शी पत्रकार परिषद*
झी मराठी आपल्या नव्या मालिकांच्या लाँचवेळी नेहमीच काहीतरी वेगळं आणि लक्षवेधी सादर करण्याचा प्रयत्न करते. पत्रकार परिषद हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता एक संस्मरणीय अनुभव ठरते. याच परंपरेला पुढे नेत यावेळी झी मराठीने ‘दीपज्योती’ या नव्या मालिकेच्या पत्रकार परिषदेत एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम सादर केला.
*‘दीपज्योती’* ही प्रेमाने आणि आपुलकीने बांधलेल्या बहीण-भावांच्या नात्याची कथा आहे. ज्योती, तिच्या दोन बहिणी आणि भाऊ यांच्याभोवती ही गोष्ट फिरते. दुसरीकडे, पुरुषोत्तम यांच्या घरंदाज कुटुंबाची कथा उलगडते. त्यांचे तीन मुलं, स्वराज, दीप आणि विराज आणि त्यांच्यासोबत आत्या असते. स्वराज वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्यास उत्सुक आहे, तर विराज आपल्या नोकरीत समाधानी आहे. मात्र, दीपच्या मनात वडिलांविषयी राग आहे. लहानपणी आईच्या निधनासाठी त्यालाच जबाबदार ठरविल्याने पुरुषोत्तम त्याचा तिरस्कार करतात.
या मालिकेच्या पत्रकार परिषदेत *महिला कुटुंब चालकांनी (रिक्षा चालक)* ज्योतीसोबत रिक्षा चालवत तिच्या संघर्षाला सलाम केला. काहींनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी तर काहींनी आपल्या आवडीपोटी हे क्षेत्र निवडल्याच्या प्रेरणादायी कथा सांगितल्या. या कथा ऐकून उपस्थित सर्वजण भावूक झाले. या धाडसी महिलांना *खास कस्टमाइज्ड ‘पदरावर रिक्शा असलेली पैठणी’* भेट देण्यात आली. तसेच उपस्थित रिक्षा चालक महिलांसाठी सर्वांसाठी मालिकेचा विशेष भाग दाखवण्यात आला.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कलाकार प्रसाद जवादे, पूर्वा कौशिक, अनुप बेलवलकर आणि मानसी सुभाष महिला प्रेक्षकांच्या आणि मीडिया प्रतिनिधींच्या प्रतिसादाने भारावून गेले आणि त्यांनी सर्वांचे आभार मानले.
मालिकेत दीप आणि ज्योतीच्या भूमिकेत प्रसाद जवादे आणि पूर्वा कौशिक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तसेच डॉ. गिरीश ओक आणि सुहास परांजपे यांच्या महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. या मालिकेचे लेखन अश्विनी अनगळ आणि सायली कुलकर्णी यांनी केले असून संवादलेखन इरफान मुजावर यांचे आहे. मालिकेचे दिग्दर्शन अमित सावर्डेकर यांनी केले आहे.
*तेव्हा पाहायला विसरू नका ‘दीपज्योती’ दररोज रात्री ८ वाजता, सदैव तुमच्या झी मराठीवर.*





