Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*चिन्मय सरांसोबत स्क्रीन शेअर करणं माझ्यासाठी ‘fan moment’!” – राज हंचनाळे*

*चिन्मय सरांसोबत स्क्रीन शेअर करणं माझ्यासाठी ‘fan moment’!” – राज हंचनाळे*



एखादा अभिनेता दुसऱ्या अभिनेत्याच्या कामाचा, त्याच्या मेहनतीचा आणि कामाच्या शिस्तीचा मनापासून आदर करत असतो. कधी कधी हा आदर ‘fan moment’मध्ये बदलतो—जेव्हा त्याला त्याच आवडत्या कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळते. *‘सनई चौघडे’* च्या सेटवर असा एक खास क्षण अभिनेता राज हंचनाळेने अनुभवला.


प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेता चिन्मय मांडलेकरने  ‘सनई चौघडे’मध्ये ‘सत्यजीत’ या भूमिकेतून दमदार एन्ट्री केली आहे.  त्यांच्या आगमनामुळे मालिकेच्या कथानकात नवा ट्विस्ट येणार आहे. सध्या कथानकात शर्वरी नोकरीसाठी मुलाखती देताना दिसते. योगायोगाने ती ज्या कंपनीत इंटरव्ह्यू देते, ती कंपनी सत्यजीतचीच आहे. त्याचवेळी जय खानोलकरही एका बिझनेस डीलसाठी सत्यजीतला भेटायला येतो आणि याच भेटीतून कथानकाला नवं वळण मिळतं.


*या ट्रॅकमध्ये राज हंचनाळेला चिन्मय मांडलेकरांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्याने आपला अनुभव शेअर करताना म्हटलं* , “चिन्मय सरांसोबत शूट करण्याचा अनुभव माझ्यासाठी खरोखरच खूप समृद्ध करणारा आणि प्रेरणादायी होता. मी त्यांचं काम नेहमीच फॉलो केलं आहे. ते माझे आवडते कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे.  खरं सांगायचं तर, त्यांच्यासारख्या दिग्गज कलाकारासोबत एका फ्रेममध्ये उभं राहणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. एका अर्थाने ‘fan moment’च होतं. थोडं प्रेशरही होतं, पण प्रचंड उत्साहही होता.

त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.  सगळ्यात आधी त्यांची कामाची शिस्त! सेटवर आल्यावर ते ज्या प्रकारे स्वतःला कॅरेक्टरमध्ये झोकून देतात, ते पाहून खूप प्रेरणा मिळते.

सीन करताना डायलॉग डिलिव्हरीमधली सहजता  आणि नॅचरल ॲक्टिंग कशी असावी, हे त्यांच्याकडून जवळून अनुभवायला मिळालं. एकंदरीत खूपच छान अनुभव होता.”


*बघायला विसरू नका 'सनई चौघडे' दररोज ८:३० वा. सदैव तुमची झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.