Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खलनायकनंतर सज्जन ‘पुरुषोत्तम’! गिरीश ओक ‘दीपज्योती’मधून नव्या अवतारात*

*खलनायकनंतर सज्जन ‘पुरुषोत्तम’! गिरीश ओक ‘दीपज्योती’मधून नव्या अवतारात*

*‘दीपज्योती’त गिरीश ओकांचा प्रभावी कमबॅक*



झी मराठीवरील *‘लाखात एक आमचा दादा’* या मालिकेत आपली भूमिका गाजवल्यानंतर *ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक* आता *‘दीपज्योती’* मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यानिमित्ताने गिरीश ओक यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल आणि मालिकेच्या अनुभवाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. “माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे *पुरुषोत्तम गायकवाड* . पुरुषोत्तमची  साड्यांची बरीच दुकानं आहेत, त्याचा साड्यांचा व्यापार आहे आणि तो त्यांनी शून्यातून उभा केलेला आहे. त्याने ही संपत्ती, व्यवसाय, साम्राज्य खूप मेहनतीने उभं केलेल आहे आणि आता मुल हे सगळं सांभाळतील, असं त्याला वाटतंय. पुरुषोत्तम अतिशय तत्वनिष्ठ, सज्जन, कुठलाही वाईट व्यवहार न करणारा, मेहनतीने कमावणारा, सचोटीने वागणारा, लोकांना मदत करणारा, हळव्या मनाचा अशी त्याच्या भूमिकेची पार्श्वभूमी आहे. त्याची बायको जिवंत नाही, पण त्याच बायकोवर अतिशय प्रेम आहे .

 

 मालिकेसाठी माझ्या निवडीबद्दल सांगायचं झालं तर मुंबईतल्या एका इव्हेंटला मला झी मराठी प्रोग्रामिंग हेड यांनी सांगितलं कि आमची एक नवी मालिका येत आहे, आणि त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी भूमिकेचा विचार केला आहे.केला आहे. त्यात तुमची एक सकारात्मक भूमिका आहे. आधी 'लाखात एक आमचा दादा' हि मालिका मी करत होतो त्यात माझी खलनायकाची भूमिका होती. आमचं रिडींग झालं, लुक टेस्ट झाली, पण मुळात हे सगळं होण्याआधीच माझी निवड या  भूमिकेसाठी झालेली होती ह्याचा मला अंदाज आलेला. माझी आधीची भूमिका होती ती अतिशय निगेटिव्ह होती. अतिशय निर्दयी, गोर गरिबांचे हाल करणार, गरिबांचे शोषण करणारा, बायकांवर अत्याचार करणारा, पैसे लुबाडणारा, स्वतःच्या परिवाराला वाईट वागवणारा अश्या वाईट स्वभावाचा-वृत्तीचा व्यक्ती होता. ह्या सगळ्या पेक्षा आताची भुमिका हि खूपच चांगली आहे. 'दीपज्योती' मालिकेत पुरुषोत्तम हा लोकांना मदत करणारा, दानशूर , घरीही  खूप सज्जन, स्वताःच्या कामात व्यवहारात सुद्धा अतिशय प्रामाणिक, सुस्वभावी, सरळ मार्गाने जाणारा असा तो आहे. 



मला सांगावस वाटतयत कि मला अगदी नावाप्रमाणे  भूमिका साकारायला मिळाल्यात, चांगली व्यक्तिरेखा म्हणजेच पुरुषोत्तम आणि वाईट खलनायकाची भूमिका म्हणजे कर्दनकाळ जालिंधर असं मला वाटत. प्रोमोचं प्रतिसाद म्हणजे लोक प्रत्यक्ष कधी भेटल्यावर सांगतात, विचारतात कि तुमची एक नवी मालिका येतेय, कधी येईल आम्ही उत्सुक आहोत बघायला, तुमची भूमिका काय आहे, हे असं सगळं विचारतात त्यामुळे त्यांचीही उत्सुकता दिसून येते. मला आशा आहे कि हि मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि त्यांचं भरभरून प्रेम ते ह्या मालिकेला आणि आम्हा सर्वांच्या व्यक्तिरेखेला पण देतील. शूटिंग दरम्यानचा किस्सा सांगायचं झालं तर आम्ही शूटिंग करत होतो आणि आमच्या मेकअप आर्टिस्ट आहे ने मला सांगितलं, कि ज्या इपी आहेत सेटवर त्यांनी मला विचारलं कि गिरीश सरानी लिपस्टिक लावली आहे का सरांचे ओठ खूप लाल दिसतायत. हा किस्सा कळल्यानंतर मी पण थोडीशी गंमत म्हणून तिला  कॉल केला. तेव्हा ती हि माझ्या गंमतिशीर स्वभावाच्या गोत्यात आलेली. मला हसत खेळत आनंदी वातावरणात काम करायला आवडत. मान अपमान, अहंकार शक्यतो कामाच्या ठिकाणी कोणी करू नयेत, सगळ्यांनी छान मिळून मिसळून राहावं, काम करावं, अश्या विचारांचा मी आहे.


 

*गिरीश ओक यांची ‘दीपज्योती’ मधील ही सकारात्मक भूमिका प्रेक्षकांना नक्कीच भावेल. तेव्हा पाहायला विसरू नका 'दीपज्योती' १३ एप्रिलपासून । दररोज रात्री ८ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.