Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*स्टार प्लसकडून अधिकृत निवेदन; "क्योंकी सास भी कभी बहू थी" बंद होण्याच्या अफवांना पूर्णविराम!*

 *स्टार प्लसकडून अधिकृत निवेदन; "क्योंकी सास भी कभी बहू थी" बंद होण्याच्या अफवांना पूर्णविराम!*


https://www.instagram.com/p/DWW1IYPDoHv/?igsh=eTIyY2V4c2xvbXQz


स्टार प्लसने त्यांच्या लोकप्रिय शो "क्योंकी सास भी कभी बहू थी"  सीझन 2 बंद होणार आणि त्याऐवजी दुसरा शो येणार असल्याच्या सर्व अफवांना अधिकृतपणे पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शो बंद करून त्याजागी " क्योंकि रिश्तों के भी रूप बदलते" हा नवा शो आणला जाणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या.



यावर स्पष्टीकरण देताना स्टार प्लसने अधिकृत निवेदन जारी करत सांगितले की या सर्व अफवा पूर्णपणे निराधार आहेत आणि शो बंद होणार किंवा त्याची जागा दुसरा शो घेणार अशी कोणतीही सत्यता नाही.


अधिकृत घोषणेत त्यांनी लिहिले, “आमच्या लक्षात आले आहे की काही माध्यमांमध्ये अशा बातम्या फिरत आहेत की " क्योंकी सास भी कभी बहू थी"  सीझन 2 बंद होत आहे आणि त्याजागी "क्योंकि रिश्तों के भी रूप बदलते" हा शो येणार आहे. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की या बातम्या निराधार आहेत. आम्ही "क्योंकी सास भी कभी बहू थी" सीझन 2 बंद करत नाही आहोत आणि सध्या तरी या शोचा शेवट ठरलेला नाही"


हे निवेदन चाहत्यांसाठी मोठा दिलासा देणारे ठरले आहे कारण  "क्योंकी सास भी कभी बहू थी" हा दूरचित्रवाणीवरील सर्वात आयकॉनिक शो मानला जातो. त्याची प्रभावी कथा आणि लक्षात राहणारी पात्रे यामुळे प्रेक्षकांमध्ये त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. या स्पष्टीकरणामुळे आता प्रेक्षक निश्चिंत झाले असून हा शो पुढेही त्यांचे मनोरंजन करत राहील, अशा प्रकारे सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.