*रंगभूमीचा मानाचा सोहळा पुन्हा सजणार – झी नाट्य गौरव २०२६ प्रेक्षकांच्या भेटीला!*
*“उत्सव रंगभूमीचा, सोहळा रंगकर्मींचा*
मराठी रंगभूमीचा सर्वात प्रतिष्ठित सोहळा *‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२६ ’* येत्या *२२ मार्च* ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रंगमंचावरील उत्कृष्ट कलाकृती, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकारांचा सन्मान करणारा हा भव्य सोहळा यंदाही तितक्याच दिमाखात साजरा होणार आहे. नाट्य गौरवच्या मंचावर यंदा मराठी नाटकांचा एक अविस्मरणीय प्रवास उलगडणार असून, या रंगतदार प्रवासाला मराठी रंगभूमीवरील दिग्गज नटसम्राटांची साथ लाभणार आहे.
वर्षभर गाजलेल्या उत्कृष्ट नाटकांचा गौरव करण्याबरोबरच, या सोहळ्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे दमदार आणि मनोरंजक नाट्यप्रवेश. दिग्गज कलाकारांसोबतच नवोदित प्रतिभावान कलाकारही आपल्या परफॉर्मन्सने रंगमंच उजळवणार आहेत. लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आपल्या खास शैलीत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत प्रेक्षकांचे मन जिंकणार आहे. त्याचबरोबर, विविध थीम्सवर आधारित खास अॅक्ट्स, नाट्यसृष्टीतील संस्मरणीय क्षणांचा आढावा आणि भावनिक तसेच प्रेरणादायी क्षणांचा अनुभव या सोहळ्यात मिळणार आहे. हा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित नसून, मराठी नाट्यसृष्टीच्या समृद्ध परंपरेचा, तिच्या संघर्षाचा आणि यशाचा उत्सव आहे. रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकासाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
*बघायला विसरू नका झी नाट्य गौरव २०२६, २२ मार्च, रविवार, सायं. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*





