Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*नो VFX, नो बॉडी डबल्स; नील भट्टच्या स्टंट-ड्रिव्हन ‘परशुराम’ टीझरसह स्टार प्लसने टीव्ही विश्वात ओलांडली अ‍ॅक्शनची मर्यादा!*

 *नो VFX, नो बॉडी डबल्स; नील भट्टच्या स्टंट-ड्रिव्हन ‘परशुराम’ टीझरसह स्टार प्लसने टीव्ही विश्वात ओलांडली अ‍ॅक्शनची मर्यादा!*


https://www.instagram.com/reel/DUXdu5TjMfk/?igsh=MXI1aXcxeHhmc2h1eA==

 

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता नील भट्टने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की तो भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कलाकारांपैकी एक आहे. नुकताच प्रदर्शित झालेला  मिस्टर अँड मिसेस परशुरामचा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे परशुरामच्या भूमिकेत असलेला नील भट्टचा भव्य, ताकदवान आणि हिरोईक स्टंट सीक्वेन्स.



मिस्टर अँड मिसेस परशुराम या मालिकेसह स्टार प्लस आणि नील भट्ट यांनी टेलिव्हिजन विश्वात अ‍ॅक्शनचा स्तर नव्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. भव्यता आणि वास्तवतेचा जबरदस्त मिलाफ या टीझरमधून दिसून येतोय. या टीझरद्वारे स्टार प्लसने टीव्ही स्टोरीटेलिंगची व्याप्ती दाखवून दिली आहे. नील भट्टसोबत हातमिळवणी करत चॅनेलने या लॉन्चला एक ‘स्टेटमेंट लॉन्च’ बनवलं आहे. फक्त शो ची सुरुवात नसून टेलिव्हिजन अ‍ॅक्शनसाठी नवा बेंचमार्क ठरवणारी भव्य सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. 


दमदार हाय-ऑक्टेन स्टंट्स असलेली जबरदस्त एंट्री करत नील भट्ट परशुरामच्या अवतारात स्क्रीनवर धडकतो आणि आजूबाजूला बाईकर्स स्टंट करत असताना तो फ्रेममध्ये एंट्री करतो आणि क्षणातच संपूर्ण सीनमध्ये उत्साहवर्धक गोष्ट घेऊन येतो. या सीक्वेन्सला आणखी प्रभावी बनवणारी गोष्ट म्हणजे हे सर्व स्टंट्स कोणत्याही VFX किंवा बॉडी डबल्सशिवाय करण्यात आले आहेत. नील भट्ट स्वतः प्रशिक्षित मार्शल आर्टिस्ट असल्यामुळे त्याच्या अ‍ॅक्शनमध्ये एक वेगळीच रॉ एनर्जी आणि वास्तवतेची झलक दिसते ज्यामुळे हा स्टंट सीक्वेन्स अधिकच प्रभावी ठरतो.


त्याचा रफ-टफ नवा लूक कमाल स्क्रीन प्रेझेन्स आणि निर्भीड अ‍ॅटिट्यूड पाहून चाहते थक्क झाले असून प्रेक्षक या सीक्वेन्सला अलीकडच्या काळातील टेलिव्हिजनवरील सर्वात स्टायलिश आणि स्फोटक स्टंट सीक्वेन्सपैकी एक असल्याचं म्हणत आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की स्टार प्लस आणि नील भट्ट यांनी मालिकेसाठी सर्वस्व झोकून दिलं आहे. मालिका विश्वात यापूर्वी कधीही न पाहिलेलं काहीतरी देण्याचा प्रयत्न यातून केल्याचं कळतंय. 


हा केवळ एक स्टंट सीक्वेन्स नाही तर नील चा नवा अवतार आहे एवढं नक्की ! परशुराममध्ये नील भट्टचं रूपांतर एका प्रभावशाली, दमदार आणि वेगळ्या अवतारात होताना दिसतंय. बाहेरून साधं कौटुंबिक आयुष्य जगणारा हा माणूस, आतमध्ये एक अत्यंत धोकादायक आणि गुप्त व्यक्तिमत्त्व लपवून ठेवतो अशी या पात्राची छटा टीझरमधून स्पष्ट होते. हे पात्र केवळ प्रेक्षकांच्या मनावरच नाही तर चर्चांवरही अधिराज्य गाजवणार आहे यात शंका नाही. 


टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू झाली असून चाहते कौतुक, उत्सुकता दर्शवताना दिसतात  आणि टीझर जर इतका दमदार असेल तर पुढे येणाऱ्या भागांमध्ये परशुरामचा प्रवास किती रोमांचक असणार आहे हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. यावरून स्टार प्लसचा कंटेंट अधिक भव्य, अधिक धाडसी आणि मोठ्या स्केलवर सादर करण्याचा स्पष्ट हेतू दिसून येतो.


शक्ती आणि जिद्द जिथे एकत्र येता आणि शांततेची जागा बंडखोरी घेते अशी ही कथा अनुभवण्यासाठी सज्ज आणि पाहायला विसरू नका मिस्टर अँड मिसेस परशुराम रोज रात्री ८:३० वाजता, फक्त स्टार प्लस वर !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.