Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*RSS ची १०० वर्षे म्हणजे साधना; ‘शतक’ चित्रपटावर बाबा रामदेवांचा भावपूर्ण संदेश*

 *RSS ची १०० वर्षे म्हणजे साधना; ‘शतक’ चित्रपटावर बाबा रामदेवांचा भावपूर्ण संदेश*


योगगुरू व पतंजली समूहाचे संस्थापक बाबा रामदेव हे दीर्घकाळापासून राष्ट्र, संस्कृती आणि आत्मनिर्भर भारत या विचारांचे ठाम प्रवक्ते  आहेत. त्यांनी वारंवार उच्चारलेली ओळ, “आम्ही मिटलो तरी चालेल, आम्ही राहिलो नाही तरी चालेल, पण हे मातृभूमी, तुझे वैभव अमर राहो”  आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षाच्या निमित्ताने तयार झालेल्या ‘शतक : संघाची १०० वर्षे’ या चित्रपटाच्या भावनेशी अतिशय सुसंगत ठरते.



RSSच्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून तयार करण्यात आलेला हा चित्रपट संघाची शंभर वर्षांची वैचारिक वाटचाल, सामाजिक योगदान आणि राष्ट्राप्रती असलेले समर्पण अधोरेखित करतो. बाबा रामदेव ज्या राष्ट्रभान, सांस्कृतिक आत्मगौरव आणि सेवा-भावनेचा सातत्याने उल्लेख करतात, तीच चेतना ‘शतक’ या चित्रपटातून प्रभावीपणे सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.


नुकताच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टीझरमधून असे दिसून येते की, संघाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या गैरसमज, टीका आणि संभ्रम यांना तथ्ये व ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून ते आणीबाणीसारख्या निर्णायक काळापर्यंत RSSची भूमिका चित्रपटात ठळकपणे दाखवण्यात आली आहे.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आनंद व्यक्त करताना बाबा रामदेव म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने संघाची विचारधारा, त्याचे योगदान, दृष्टी आणि हिंदू समाजाची एकता व राष्ट्राच्या अखंडतेसाठी संघाने केलेला संघर्ष अत्यंत प्रेरणादायी आहे. युगानुयुगे चालत आलेली आपली प्राचीन सनातन संस्कृती, ऋषीपरंपरा तसेच वीर-वीरांगनांची गौरवशाली परंपरा जपत भारताला आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक महासत्ता बनवण्याची जी संकल्पना आहे, त्यात संघाचे योगदान ऐतिहासिक आहे.”


‘शतक : संघाची १०० वर्षे’ या चित्रपटाबाबत आपला संदेश देताना ते पुढे म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी म्हणजे केवळ एक कालखंड नाही, तर सेवा, संस्कार आणि राष्ट्रसमर्पणाच्या शंभर वर्षांची तपश्चर्या आहे. हाच भाव सशक्तपणे मांडणाऱ्या ‘शतक : संघाची १०० वर्षे’ या चित्रपटासाठी संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो. हा चित्रपट सनातन संस्कृती, ऋषीपरंपरा आणि राष्ट्राच्या अखंड चेतनेला सोप्या व प्रभावी पद्धतीने जन-जनापर्यंत पोहोचवेल. संघाची विचारधारा कोणत्याही एका संघटनेपुरती मर्यादित नसून ती राष्ट्रभानाची विचारधारा आहे. ‘शतक’ हा चित्रपट कोट्यवधी पूर्वजांच्या त्यागाला आणि लाखो स्वयंसेवकांच्या निःस्वार्थ सेवेला आदरांजली आहे. आम्ही मिटलो तरी चालेल, आम्ही राहिलो नाही तरी चालेल, पण हे मातृभूमी, तुझे वैभव अमर राहो. या संकल्पनेची जाणीव समाजात जागृत व्हावी आणि भारताला विश्वगुरू बनवण्याच्या प्रवासाला हा चित्रपट नवी प्रेरणा देवो, हीच माझी शुभेच्छा आहे.” राष्ट्रनिर्माण आणि देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित करणारा हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.