Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्टार प्रवाहवर येतेय नवी प्रेरणादायी मालिका ‘आनंदी’

 स्टार प्रवाहवर येतेय नवी प्रेरणादायी मालिका ‘आनंदी’

 

स्टार प्रवाह वाहिनीने आजवर मालिका विश्वात निरनिराळे सामाजिकभावनिक आणि वास्तवाशी जोडलेले विषय हाताळत प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं आहे. या यशस्वी परंपरेला पुढे नेत स्टार प्रवाह वाहिनी आता हृदयाला भिडणाऱ्या कथेसह सज्ज झाली आहे. येत्या १६ मार्चपासून स्टार प्रवाहवर सुरू होतेय नवी मालिका ‘आनंदी’.

मालिकेच्या शीर्षकाला साजेशी अशीच या मालिकेची गोष्ट आहे. ही कथा आहे आनंदीची. एका अपघातात दृष्टी गमावलेल्यापण तरीही जीवनाकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनाने पाहणाऱ्या तरुणीची. डोळ्यांनी जग दिसत नसलंतरी मनाने आणि संवेदनांनी आनंदी संपूर्ण जग अनुभवते. तिचं अंधत्व हा तिचा दुबळेपणा नसून तिची सगळ्यात मोठी ताकद आहे. इतरांना सहज न सापडणाऱ्या गोष्टी आनंदी सहज ओळखते. ती अत्यंत संवेदनशील असून गरजूंना मदत करणं हा तिच्या स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. कधी कधी आपले डोळे आपल्याला फसवू शकतातपण मन कधीच नाही हा आनंदीचा जीवनमंत्र आहे. जगण्याचा भरभरून आनंद घेणारी आनंदी म्हणूनच इतरांपेक्षा वेगळी ठरते.




या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, स्टार प्रवाह नेहमी वेगळ्या व्यक्तिरेखा असलेल्या पात्रांची कथा निवडतं. आपल्या अवती-भवती अशी माणसं दिसतात. आनंदीची गोष्ट सादर करताना अभिमान वाटतोय कारण दृष्टी नसली तरी दृष्टीकोन असलेली मुलगी तिच्या नजरेतून हे जग कसं पहाते हे पाहून नक्की स्फुर्ती आणि प्रेरणा मिळेल. नावाप्रमाणे आनंदी सुख आणि आनंद पसरवत मन जिंकेल याची खात्री आहे. आयुष्यात खचून न जाता एक सकारात्मक जीवन जगता येतं ही या गोष्टीची ताकद असेल.

या मालिकेतून नवोदित अभिनेत्री जाई खांडेकर मालिका विश्वात पदार्पण करत आहे. आजवर अनेक नाटकांच्या माध्यमातून अभिनयदिग्दर्शन आणि लेखिका अशी तिहेरी भूमिका पार पाडलेल्या जाईसाठी ‘आनंदी’ ही भूमिका एक नवा आणि आव्हानात्मक अनुभव आहे. या भूमिकेविषयी सांगताना जाई खांडेकर म्हणाली, आनंदी नावाप्रमाणेच आनंदी स्वभावाची मुलगी आहे. ही फक्त एक भूमिका नाहीतर ती एक भावना आहे. डोळ्यांनी दिसत नसलेल्या गोष्टी आनंदी मनाने अनुभवते आणि तिच तिची खरी ताकद आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आणि जबाबदारी आहे. या भूमिकेसाठी आम्ही एका अंध मुलांच्या संस्थेत जवळपास आठवड्याभराचं वर्कशॉप केलं. या मुलांच्या दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी खूप जवळून अनुभवता आल्या. प्रेक्षकांना आनंदी नक्कीच आपलीशी वाटेल असा मला विश्वास आहे.

तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका आनंदी १६ मार्चपासून  फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.