Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेतील छोट्या सावित्रीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम

 स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेतील छोट्या सावित्रीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम

 


स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळतोय. विशेष करुन या मालिकेतील लहानग्या सावित्रीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सावित्रीबाईंचा ठाम निर्धारआत्मविश्वासशिक्षणाची ओढअन्यायाविरोधात उभं राहण्याची ताकद आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द या सगळ्या गुणांचा प्रत्यय लहानग्या सावित्रीने साकारलेल्या प्रत्येक प्रसंगात जिवंत होते. ही भूमिका साकारणारी गुणी बालकलाकार तक्षा शेट्टी हिने आपल्या सहज अभिनयातून सावित्रीबाईंचं बालपण अतिशय प्रामाणिकपणे साकारलं आहे. तिच्या निरागस डोळ्यांत दिसणारा प्रश्नार्थक भावअन्यायाविरोधात उभं राहण्याची धडपडशिक्षणासाठी असलेली आंतरिक जिद्द आणि स्वप्न पाहण्याचं धाडस या सगळ्यांतून भावी क्रांतीची चाहूल मिळते.



सावित्रीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखलेही छोट्या सावित्रीचा अभिनय पाहून भारावून गेली आहे. छोट्या सावित्रीचं कौतुक करताना मधुराणी म्हणाल्या, छोट्या सावित्रीची चुणूक आणि सावित्रीबाईंच्या भूमिकेसाठी लागणारी ऊर्जा तक्षाने सहजरित्या पकडलीं आहे. मला प्रचंड अभिमान वाटतो तिचा अभिनय पहाताना. तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा माझ्याच छोट्या रुपाला भेटल्याचा भास झाला. इतक्या लहान वयातही तिची मेहनततिचं शिस्तबद्ध कामतिची प्रत्येक सीनबद्दलची तळमळ खरंच वाखाणण्यासारखी आहे. ती फक्त भूमिका साकारत नाहीतर ती ती भूमिका मनापासून जगते. हे खरंच कौतुकास्पद आहे. असंच आमच्या मालिकेला प्रेम देत रहा आणि न चुकता पहा मी सावित्रीबाई जोतीराव फुले सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.