Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*रोहित राऊत ठरले भारताचे पहिले आय- पॉपस्टार, अॅमेझॉन एमएक्स प्लेयरतर्फे पहिला ब्लॉकबस्टर सीझन सादर*

 *रोहित राऊत ठरले भारताचे पहिले आय- पॉपस्टार, अॅमेझॉन एमएक्स प्लेयरतर्फे पहिला ब्लॉकबस्टर सीझन सादर*  


आय- पॉपस्टारची भव्य अंतिम फेरी पाहा मोफत, केवळ अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर 



*मुंबई, भारत, 28 नोव्हेंबर 2025* – सहा अविस्मरणीय आठवडे आणि तब्बल 85 ओरिजनल ट्रॅक्सनंतर देशभरात नव्या, स्वतंत्र पॉप आवाजांची लाट आणणाऱ्या अॅमेझॉन एमक्स प्लेयरवरील आय- पॉपस्टारच्या पहिल्या सीझनची सांगता झाली. भारतातील म्युझिक रिअलिटी शोजमधे नवा मापदंड प्रस्थापित करणाऱ्या या शो ची सांगता एका दिमाखदार अंतिम फेरीसह करण्यात आली. प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद, सोशल मीडियावर गाजणारी नवी गाणी आणि एका रात्रीत स्टार बनणारे आर्टिस्ट यांच्यासह झालेल्या या अंतिम फेरीत अस्सल कला आणि भारतीय पॉप संगीताचा पुनर्जन्म साजरा करण्यात आला.   


अंतिम फेरीची सुरुवात स्पर्धकांनी स्टेजवर जबरदस्त परफॉर्मन्स सादर करत झाली. प्रत्येकाच्या आवाजातून भारताच्या या सर्वात मोठ्या स्टेजवर त्यांचा प्रवास उलगडला. चरण पथानिया यांनी कॉन्सर्ट- स्टाइलमधे आपला परफॉर्मन्स सादर करत अंतिम फेरीची दमदार सुरुवात केली. यावेळी गायिका राधिका भिडे यांनी आपला परफॉर्मन्स सादर करण्यापूर्वी मुनावर फारूकी यांनी त्यांची अनोखी ओळख करून दिली तो क्षण सर्वांसाठीच हृद्यस्पर्शी होता. त्यानंतर राधिका यांनी सर्वांसमोर, विशेषतः रत्नागिरीवरून आलेल्या आपल्या कुटुंबासमोर गायन सादर केलं. त्यानंतर मुनावर यांनी आपली एका नर्मविनोदी स्टँडअपमधून सर्वांचा मूड बदलला आणि त्याचवेळेस प्रिन्स नरूला खास पाहुणे म्हणून मेंटॉर्समधे सहभागी झाले. त्यांनी या शोला मिळत असलेल्या लोकप्रियतेचं भरभरून कौतुक केलं आणि आपल्या मुलीचा आय- पॉपस्टारमधल्या गाण्यांवर ताल धरत असतानाचा व्हिडिओही दाखवला. अंतिम स्पर्धकांनी त्यांचं सादरीकरण पूर्ण केल्यानंतर संपूर्ण भारत ज्या क्षणाची वाट पाहात होता, त्या क्षणासाठी स्टेज सज्ज करण्यात आलं.   



टॉप 2 मधे टीम किंगचे रिषभ पांचाल आणि टीम पर्मिशचे रोहित राऊत यांचा समावेश होता. काही क्षणानंतर रोहित राऊत यांना पहिल्यावहिल्या आय- पॉपस्टारचा विजेता घोषित करण्यात आलं आणि 7,00,000 रुपयांचं बक्षिस प्रदान करण्यात आलं. रनर अप ठरलेल्या रिषभ पांचाल यांना 3,00,000 रुपयांचं बक्षिस मिळालं. दोघांना यावेळी केवळ बक्षिसंच नव्हे, तर देशभरात चाहतावर्गही मिळाला. 

रोहित राऊत यांनी अतिशय भावनिक शब्दांत आपला प्रवास उलगडला. ते म्हणाले, ‘आय- पॉपस्टारमधे मी कलाकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख शोधायचा प्रयत्न केला आणि काही आठवड्यांनंतर आज मी विजेतेपदी उभा आहे. या विजेतेपदानं मला माझ्या कलेचा पाठपुरावा करण्यासाठी आत्मविश्वास दिला आहे. मी माझे मेंटॉर परमिश पाजी यांचा आभारी आहे. त्यांच्याशिवाय आणि अर्थातच माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या चाहत्यांशिवाय हे शक्य झालं नसतं.  


हा पुरस्कार मी आपल्या चौकटीबाहेर पडून गुणवत्ता सिद्ध करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक प्रादेशिक कलाकाराला अर्पण करतो. सरतेशेवटी अॅमेझॉन एमएक्स प्लेयरनं माझ्यासारख्या स्वतंत्र कलाकाराला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करत गुणवत्ता दर्शवण्याची आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.’



रोहितच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत परमिश वर्मा म्हणाले, ‘या कलाकारांनी दाखवलेली पॅशन असामान्य आहे. ते इथे आले, तेव्हा आपलं अस्तित्व शोधत होते आणि हळूहळू त्यांनी आपली कला अधिक दमदारपणे देशभरातील प्रेक्षकांसमोर सादर करायला सुरुवात केली. पहिलावहिला आय- पॉपस्टार माझ्या टीमचा आहे याचा मला अभिमान वाटतो. पहिल्या दिवसापासूनच रोहितने आपली गुणवत्ता दाखवायला सुरुवात केली होती आणि त्याला विकसित होताना, प्रयोग करताना, सर्वांना खिळवून ठेवताना पाहणं निव्वळ आनंददायी होती. आमच्यासाठी ही गोष्ट या शोच्या यशापेक्षाही मोठी आहे. हा भारत मोठ्या स्तरावर स्वतंत्र पॉपसाठी तयार असल्याचा पुरावा आहे.’ 


या ब्लॉकबस्टर सीझनविषयी किंग म्हणाले, ‘आय- पॉपस्टारने आपल्याला भारतीय पॉप क्षेत्राचं भविष्य कसं असेल याची झलक दाखवली आणि हे भविष्य दमदार, धाडसी व अस्सल असेल. या तरुण कलाकारांना फुलताना, जोखीम घेताना, बिनधास्तपणे स्वतःला व्यक्त करताना पाहून मला स्वतंत्र संगीत का महत्त्वाचं आहे याची नव्यानं जाणीव झाली. यातल्या प्रत्येकानं स्टेजवर सच्चेपणा आणला आणि म्हणूनच हा संपूर्ण शो आणखी खास ठरला आहे.’ 



कलाकाराला प्रथम प्राधान्य, ओरिजनल ट्रॅक्सवर भर, भारतातील आघाडीच्या पॉप गायकांकडून मार्गदर्शन अशी वैशिष्ट्ये असलेल्या आय- पॉपस्टारच्या पहिल्या सीझनची सांगता झाली. हा शो स्वतंत्र संगीतासाठी मुख्य प्रवाहातील महत्त्वाचा शो ठरला. गीतलेखन, वैयक्तिक ठसा आणि स्टेजवरचं सादरीकरण यांना महत्त्व देणाऱ्या या शो ने नव्या पिढीच्या कलाकारांना त्यांच्या शैलीनुसार प्रसिद्धी मिळवण्यास मदत केली. कोलॅबरेशन नव्या उंचीवर नेत अॅमेझॉन एमएक्स प्लेयरनं वॉर्नर म्युझिक आणि स्पॉटिफाय ची म्युझिक पार्टनर म्हणून निवड करत अनोखी सांगीतिक पर्वणी दिली आहे. 

आय- पॉपस्टारचे सर्व एपिसोड्स अॅमेझॉन एमएक्स प्लेयर, मोबाइल, कनेक्टेड टीव्हीज, अॅमेझॉन शॉपिंग अ‍ॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही आणि एयरटेल एक्स्ट्रीमवर मोफत स्ट्रीम होत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.