*अॅमेझॉन एमएक्स प्लेअरच्या एल्विश यादव आणि मल्हार राठोड अभिनीत ‘औकात के बाहर’मध्ये प्रेम, महत्वाकांक्षा आणि कँपस पॉलिटिक्सचा टकराव, पहायला मिळणार, ट्रेलर प्रदर्शित!*
रस्क मीडियाची निर्मिती असलेला औकात के बाहर अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर दिनांक 3 डिसेंबरला रोजी विशेष स्वरुपात प्रिमियर होत आहे, तो ही अगदी मोफत
*मुंबई, भारत- 27 नोव्हेंबर, 2025 :* अॅमेझॉनची मोफत व्हिडिओ स्ट्रिमिंग सेवा- अॅमेझॉन एमएक्स प्लेयरने आपला आगामी कँपस ड्रामा औकात के बाहर या हृदयस्पर्शी कथानकाची घोषणा केली आहे, जे आपल्याला कोलाहलाने भरलेल्या कँपस जीवनाच्या अस्सल जगात घेऊन जाते. दिल्लीच्या सजीव बॅकड्रॉपवर चित्रीत केलेला हा शो हसू, प्रेमभंग, कँपसमधली दुष्मनी आणि मॉर्डन रोमान्सचा मिलाफ आहे. कॉलेजमधील जीवनाच्या झळाळत्या एनर्जीत हा सामावून घेतो. एल्विश यादवचे प्रमुख भूमिकेतून पदार्पण होत असून औकात के बाहरमध्ये मल्हार राठोड, हेतल गाडा, निखील विजय आणि केशव साधना हे कलाकार देखील महत्वपूर्ण भूमिकांमधून आपल्या भेटीला येत आहेत.
एल्विश यादव साकारत असलेल्या राजवीर अहलावतसोबत ट्रेलरची सुरुवात होते, राजवीर हा सफीदों, हरियाणाचा नम्र तरीही प्रखर व्यक्तीमत्वाचा मुलगा आपल्या अवाक्यापलिकडली स्वप्न पाहत दिल्लीच्या उच्चभ्रू कॉलेजमध्ये पाऊल ठेवतो. फ्रेशर पार्टीमध्ये त्याची थट्टा झाल्यावर, तो त्याची सिनियर अंतरा शुक्ला हिला (मल्हार राठोड द्वारे अभिनीत) इंप्रेस करण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता पैज लावतो. अंतरा शुक्ला आत्मविश्वासू, राजनैतिक प्रभाव असलेली विद्यार्थिनी आहे, जी भावनांना आपल्यापासून मैलभर लांब ठेवते. अविचारी आव्हान लवकरच अधिकाधिक सखोल होत जाते, तसे राजवीरला अभिमान आणि भावनेच्या गुंत्यात अडकल्याचे जाणवू लागते आणि अंतराला ती महत्वाकांक्षा आणि आपुलकीमध्ये गुंतत असल्याचे लक्षात येते. कॉलेजमधले राजकारण आणि भावनात्मक मतभेद केंद्रस्थानी असलेला औकात के बाहर प्रतिमा आणि प्रतिभा, गर्व आणि असुरक्षिततेमधल्या कालातीत तणावाचा शोध घेतो.
सिरीजबद्दल बोलताना अॅमेझॉन एमएस प्लेअरचे डायरेक्टर आणि हेड ऑफ कंटेंट, अमोघ दुसाद म्हणाले, “खऱ्या खुऱ्या भावना आणि अनुभवांना प्रतिबिंबीत करणाऱ्या, प्रेमळ, मिश्किल आणि भावनाप्रधान कथा दाखवणे हा अॅमेझॉन एमएक्स प्लेअरचा उद्देश आहे. औकात के बाहरमध्ये तारुण्यातले प्रेम आणि भावनात्मक सखोलता आणि कँपसमधल्या राजकारणामधला विरोधाभास दाखवला गेला आहे. ही निवड, प्रगती आणि प्रेम करण्यासाठी लागणाऱ्या धैर्याची गोष्ट असल्यामुळे भारतीय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”
सिरीजमधले राजवीर हे पात्र साकारण्याबद्दल बोलताना एल्विश यादव म्हणाला, “औकात के बाहर मला अतिशय प्रिय आहे कारण हा प्रेमकथेहून जास्त आहे. आत्मसन्मान, प्रामाणिकपणा आणि तुमच्याबद्दल लगेच मत बनवणाऱ्या जगात स्वत:ची जागा बनवण्याच्या राजवीरच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अॅमेझॉन एमएक्स प्लेअरपासून करायला मी अतिशय आतूर आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की प्रेक्षक माझ्याप्रमाणेच या कथेशी कनेक्ट होतील.”
अंतरा शुक्ला पात्र साकारणारी मल्हार राठोड म्हणाली, “अंतरा आत्मविश्वासू, महत्वाकांक्षी आणि न झुकणारी असली तरीदेखील त्यामागे शक्तीचा असुरक्षिततेसोबत समतोल साधण्यास शिकत असलेली मुलगीसुध्दा दिसते. औकात के बाहर प्रेम, निष्ठा आणि व्यक्तीगत धेय्यांना सुंदर चित्रीत करतो. प्रेक्षकांनी या गतीमान, त्रुटी असलेल्या तरीदेखील हृदयस्पर्शी नातेसंबंधाला स्क्रीनवर सजीव होताना पाहण्याची मला उत्सुकता आहे.”
औकात के बाहर एमएक्स प्लेयरवर विशेष स्वरुपात 3 डिसेंबरला प्रीमियर होणार आहे, एमएक्स प्लेयर ॲप, अॅमेझॉन शॉपिंग ॲप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही आणि एयरटेल एक्स्ट्रिमवर आपल्याला अगदी मोफत मिळणार आहे.
Trailer Link: https://youtu.be/JMOycsz9omM
