Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेने रचला इतिहास; गाठला पाच हजार भागांचा उत्तुंग टप्पा!

 *ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेने रचला इतिहास; गाठला पाच हजार भागांचा उत्तुंग टप्पा!*

_मालिकेचा समृद्ध वारसा दाखवणारा नॉस्टॅल्जिक प्रोमो प्रदर्शित!_


मालिका विश्वात कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार चॅनल म्हणजे स्टार प्लस! स्टार प्लसवरील आयकॉनिक शो ये रिश्ता क्या कहलाता है ने अभूतपूर्व कामगिरी करत पाच हजार  भागांचा टप्पा गाठला आहे. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात प्रथमच एका डेली फिक्शन शोने इतक्या विलक्षण भागांचा टप्पा गाठला आहे. ही मालिका केवळ एक कथा नसून यातील पात्रांचा समृद्ध वारसा आहे जो दशकांपासून लाखो प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत आहे.



मालिकेच्या या ऐतिहासिक क्षणाचा सन्मान म्हणून स्टार प्लस आणि मालिकेच्या टीम ने एक खास प्रोमो प्रदर्शित केला असून ये रिश्ता क्या कहलाता है  मालिकेच्या पाच हजार भागांचा सुंदर प्रवास यातून अनुभवयाला मिळेल. याप्रसंगी या भव्य कामगिरीसाठी मालिकेने प्रेक्षकांचे देखील विशेष आभार मानले आहेत. ज्या कुटुंबांनी वर्षानुवर्षे मालिकेला आपल्या घरात स्थान दिले, या प्रत्येक पिढ्यांना जोडून ठेवून त्यांना घरच्या सदस्यांप्रमाणे प्रेम दिले आहे. 


या खास प्रोमोची सुरुवात प्रेक्षकांच्या मनात आजही जिवंत असलेल्या हिना खान आणि करण मेहरा यांनी साकारलेल्या

अक्षरा आणि नैतिक यांच्या कालातीत प्रेम कहाणीने होते, जिने या मालिकेची भक्कम पायाभरणी केली होती. त्यानंतर हा प्रोमो प्रेक्षकांना नियारा आणि कार्तिक म्हणजेच शिवांगी जोशी आणि मोहसिन खान यांनी जिवंत केलेल्या या नव्या जोडीकडे प्रेक्षकांना घेऊन येतो, ज्यांनी मालिकेला नवी ओळख दिली होती. यानंतरचा हा प्रवास अक्षरा आणि डॉ. अभिमन्यू यांच्या कथेकडे वळतो, जे प्रणाली राठोड आणि हर्षद चोप्रा यांनी साकारले होते. या जोडीने मालिकेला छान ट्विस्ट देऊन मालिका वेगळ्या उंचीवर पोहचवली होती आणि आता मालिकेतील नवीन पिढी अभीरा आणि अरमान म्हणजेच समृद्धी शुक्ला आणि रोहित पुरोहित यांच्या अभिनयातून उलगडणारी त्यांची कहाणी येते. जे अडचणी, संकटांच्या लाटांमध्येही एकमेकांना साथ देऊन प्रेमाला अनोखी परिभाषा देतात. या दोघांच नातं संघर्षांवर मात करत आशा आणि धैर्य यासोबत एकत्र येण्याचं प्रतीक बनलं आहे, ज्यावर या मालिकेची पुढील कथा बेतली आहे.


"ये रिश्ता क्या कहलाता है" पाहायला विसरू नका या बुधवारी रात्री 9:30 वाजता केवळ स्टार प्लसवर !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.