*‘आई तुळजाभवानी’ मालिकेचे नवं दैवी पर्व !*
पहा एका तासाचा विशेष भाग — २ नोव्हेंबर, संध्या ७ वा. फक्त कलर्स मराठीवर!
*मुंबई, ३० ऑक्टोबर २०२५:* कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’ आता एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचली आहे. भक्ती, शक्ती आणि नियती यांच्या संगमातून घडणाऱ्या या अलौकिक मालिकेत आता प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे एक दैवी, भावनिक आणि रूपांतरण घडवणार पर्व. बाल जगदंबा आता मोठी होणार आहे. तिच्यासाठी तिचे आई-वडील योग्य वराच्या शोधात आहेत. पण हेच होत असताना एक आश्चर्यकारक सत्य समोर येतं जगदंबेच्या कुंडलीत अजोड योग आहे! तिची आणि साक्षात देवी सतीची कुंडली एकसारखी असल्याचं समजताच तिच्या आई-वडिलांना धक्का बसतो. म्हणजेच पतीच्या सन्मानासाठी मृत्यूचा योग तिच्या नशिबी आहे का? दुसरीकडे, मनोमन जगदंबेने महादेवाला आपला वर मानलं आहे. नियतीने यावेळी रचले आहे एक विचित्र आणि अद्भुत योग जगदंबेच्या नशिबी येणार आहे देवी सतीचे भोग! *‘आई तुळजाभवानी’ मालिकेचे नवं दैवी पर्व* पहा एका तासाचा विशेष भाग २ नोव्हेंबर, संध्या ७ वा. फक्त कलर्स मराठीवर!
आतापर्यंत देवी तुळजाभवानी आणि तिच्या अंशरूप जगदंबेच्या भक्तीपूर्ण प्रवासाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण आगामी महाएपिसोड मध्ये मालिकेची दिशा नव्या रंजक वळणावर येणार आहे. या महत्त्वाच्या भागात “जगदंबा तुळजा एकरूप होतात” अशी दैवी घटना घडते, जी संपूर्ण कथानकाचा प्रवाह बदलून टाकणार आहे. या प्रसंगामध्ये जगदंबेच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक क्षण साकारला जातो. एका बाजूला तिच्या भक्तीची पराकाष्ठा, तर दुसऱ्या बाजूला देवी तुळजाभवानीचं साक्षात शक्तिरूप या दोन प्रवाहांचा संगम या अध्यायात एकत्र येतो. हे एकरूप होणं म्हणजे केवळ दैवी परिवर्तन नाही, तर भक्ती, शक्ती आणि त्यागाच्या तिन्ही स्वरूपांचा अलौकिक संगम आहे.
एका महत्वपूर्ण उद्देशासाठी होणाऱ्या या ‘एकरूपते’तून निर्माण होणाऱ्या घटनांची मालिका प्रेक्षकांसाठी नक्कीच भावनिक आणि दैवी अनुभव ठरणार आहे, नियतीचा नवा अध्याय उलगडणार आहे. जगदंबेच्या आयुष्यात नक्की काय घडणार आहे? तुळजा आणि जगदंबेच्या एकरूपतेनंतर निर्माण होणाऱ्या शक्तीचं भवितव्य काय ठरेल? शक्तीच्या या विलयातून विश्वात कोणता नवा अध्याय सुरू होणार आहे? हे जाणून घेण्यासाठी पाहा ‘आई तुळजाभवानी’चा हा विशेष महाएपिसोड जिथे जगदंबा आणि तुळजा एकरूप होतात २ नोव्हेंबर रोजी, संध्या ७ वाजता, फक्त कलर्स मराठीवर!





