*इंद्रायणी पुढे नवं आव्हान श्रीकलाची दिग्रस्कर कुटुंबात होणार एंट्री ?*
पहा इंद्रायणी दररोज संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
*मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२५ :* कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेतील घटनाक्रम आता अधिकच रोमांचक वळण घेत आहेत! इंद्रायणीला वारंवार येणाऱ्या संकटाविषयीचे संकेत आता सतत मिळत आहेत. तिच्या मनात अस्वस्थता आहे… कारण तिला वारंवार एकच संकेत मिळतोय “संकट येणार आहे!” तिच्या स्वप्नात तिला अलर्ट करणारे गोविंद महाराज आणि त्यानंतर त्याच स्वप्नात दिसणाऱ्या संकटाचं सावट म्हणजेच श्रीकलाचा चेहरा पाहून इंदू गोंधळलेली आहे. नेमकं श्रीकला हीच दिग्रसकर घराण्यावरचं संकट आहे का? की काहीतरी अजून खोल दडलंय? तसं असेल तर इंद्रायणी याचा सामना कसा करणार? श्रीकला बाबत असलेली इंदूची शंका खरी ठरणार का?या सगळ्याचा विचार करणारी इंद्रायणी आता दिग्रसकर कुटुंबाची सून म्हणून आणि घराची रक्षणकर्ती म्हणून घराचं रक्षण करण्यास सज्ज झाली आहे. मग ते संकट कोणत्याही रूपात येवो, इंद्रायणी त्यासाठी खंबीर आहे असं पाहायला मिळणार. श्रीकलाच्या मनसुब्यांवर इंद्रायणी कशी मात करणार?
एकीकडे इंद्रायणीला मिळालेले संकेत तर दुसरीकडे श्रीकला बद्दल गोपाळ आणि घरच्यांची वाढती आपुलकी. या सगळ्यातून इंद्रायणी श्रीकलाचं खरं रूप काय हे कसं शोधून काढणार? गोपाळच्या मनात श्रीकला बद्दल असलेल्या भावना याचा श्रीकला पुरेपूर वापर करून दिग्रसकर कुटुंबात एन्ट्री घेण्याचा तिचा प्लॅन यशस्वी होऊ देईल का इंद्रायणी? इंद्रायणीसमोर उभं ठाकलंय नविन आव्हान.
एकीकडे गोपाळने केलेली श्रीकला सोबतच्या लग्नाची घोषणा, आणि दुसरीकडे इंदूच्या मनात भीतीचं सावट या सर्व घटनांच्या दरम्यान, आता इंदू विठूरायाकडे उत्तर शोधतेय.
आता पाहणं रोचक ठरणार आहे की, श्रीकलाच्या रूपाने दिग्रसकरांच्या आयुष्यात आलेलं हे संकट इंदू कसं ओळखते आणि त्यावर मात कशी करते?
पहा ‘इंद्रायणी’, ४ नोव्हेंबर संध्याकाळी ७ वा. फक्त कलर्स मराठीवर.


