Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच होणार 'बीच वेडिंग'

*मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच होणार  'बीच वेडिंग'*

*समर- स्वानंदी सहपरिवार पोहचले गोव्यात  !*

*मुंबईत मुहूर्तमेढ आणि स्वानंदीचा खास मेहंदी सोहळा* 




मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच एका भव्य *‘बीच वेडिंग’* चा सोहळा पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या मनात घर करणारी झी मराठीवरील लोकप्रिय मालिका *‘वीण दोघातली ही तुटेना’* सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचली आहे. समर आणि स्वानंदी यांच्या प्रवासात आता नवीन वळण येणार आहे, ज्याची सर्व चाहत्यांना आतुरता आहे. *आधिरा आणि रोहन* यांच्या लग्नासाठी *समर आणि स्वानंदी* प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसणार आहेत. अनेक अडथळ्यांवर मात करत अखेर दोघांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. या लग्न मांडवात एक नाही तर दोन लग्न होणार आहेत आधिरा-रोहन आणि समर-स्वानंदी.





 या खास लग्न सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी मालिकेची संपूर्ण टीम गोव्याला दाखल झाली आहे, ज्यामुळे मालिकेच्या कथानकाला एक नवा रंग मिळाला आहे. दक्षिण गोव्याच्या आलिशान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार असून समुद्रकिनाऱ्याच्या मनोहारी वातावरणात ‘बीच वेडिंग’चा थाटमाट पाहायला मिळणार आहे. सजवलेला समुद्रकिनारा, सुंदर फुलांनी नटलेला मंडप आणि कलाकारांचे आकर्षक पोशाख हे या विशेष भागाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. आधिरा आणि रोहन यांच्या प्रेमकहाणीला झालेली सुरुवात जितकी हृदयस्पर्शी आहे, तितकाच समर आणि स्वानंदी यांच्या निर्णयाने मालिकेला एक भावनिक वळण मिळणार आहे. भावंडांच्या प्रेमासाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय पुढे त्यांच्या आयुष्यात काय बदल घडवतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. गोव्याला निघण्याआधी *मुंबईत मुहूर्तमेढ आणि स्वानंदीचा खास मेहंदी सोहळा* पार पडला. या आनंदात रोहन आणि संपूर्ण कुटुंब उत्साहाने सहभागी झाले. सर्वजण हसत-खेळत आणि गोड गप्पा मारत हे क्षण साजरे करत होते. सोहळ्यातील उत्साह आणि आनंदाची ऊर्जा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.




*तेव्हा तयार व्हा, झी मराठीवर सोम ते शनि संध्या ७:३० वा. प्रसारित होणाऱ्या ‘वीण दोघातली ही तुटेना’ च्या लग्न विशेष भागांसाठी. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर रंगणारं हे भव्य लग्न आणि त्यातली भावनिक कहाणी नक्कीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल.*





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.