Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'वीण दोघातली ही तुटेना' मध्ये ११ दिवसांचा महाविवाह सोहळ्याचा जल्लोष!

*'वीण दोघातली ही तुटेना' मध्ये ११ दिवसांचा महाविवाह सोहळ्याचा जल्लोष!*

*२९ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर  झी मराठीवर साजरा होणार राजवाडे घराण्याचा भव्य विवाह सोहळा !*



झी मराठीने आपल्या प्रेक्षकांसाठी नेहेमीच काहीतरी वेगळं आणि लक्षवेधी सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकत आली आहे, आणि यावेळी देखील पुन्हा एकदा हाच झी मराठीचा छोटा पडदा एका अविस्मरणीय सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे राजवाडे घराण्याच्या लग्नसोहळ्यासाठी! *‘वीण दोघातली ही तुटेना’* या मालिकेतील हा विवाह सोहळा मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात नवा मानदंड निर्माण करणार आहे. 


मुहूर्त ठरलाय, तयारी जोरात सुरू आहे. *२९ ऑक्टोबरपासून ते ११ नोव्हेंबरपर्यंत* हा जल्लोष रंगणार असून, *राजवाडे आणि सरपोतदार* कुटुंब प्रत्येक दिवस एक नवा सोहळा घेऊन येणार आहेत. 



गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात, *आधिरा- रोहन* आणि *स्वानंदी- समर* यांच्या यांचं डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. मुहूर्तमेढ, मेहेंदी, चुडा, हळद, सीमांत पूजन आणि शेवटी अविस्मरणीय विवाहसोहळा हा प्रत्येक कार्यक्रम या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 


*कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे —*

*२९ ऑक्टोबर: मुहूर्तमेढ*

*३० आणि ३१ ऑक्टोबर: मेहेंदी*

*१ आणि २ नोव्हेंबर: चुडा*

*५ आणि ६ नोव्हेंबर: हळद*

*७ नोव्हेंबर: सीमांत पूजन*

*१० आणि ११ नोव्हेंबर: अविस्मरणीय विवाह सोहळा*


परंपरा, संस्कृती आणि आधुनिकतेचा मिलाप असलेला हा विवाह सोहळा प्रेक्षकांसाठी एक खास अनुभव ठरणार आहे. महाराष्ट्राचा महाविवाह सोहळा रंगणार, तुम्हाला आशीर्वाद दयायला नक्की यावं लागणार!



*तेव्हा बघायला विसरू नका 'वीण दोघातली ही तुटेना' सोम- शनि संध्या ७:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.