*स्टार परिवार अवॉर्ड्स 2025 प्रोमो: रूपाली गांगुली आणि कंवर ढिल्लों करणार सूत्रसंचालन!*
देशातील मोठमोठ्या शोज चे प्रसारण करणारी, आघाडीची मनोरंजन वाहिनी स्टार प्लस यावर्षी आपला 25 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. दर वर्षी, स्टार परिवार अवॉर्ड्सच्या माध्यमातून ही वाहिनी आपला वारसा थाटात साजरा करते आणि 2025 हे या प्रसिद्ध सोहळ्याचे रजत जयंती वर्ष आहे. या सोहळ्यात स्टार प्लसचे नाव घरोघरी पोहोचवणाऱ्या मालिका आणि त्यातील कलाकार यांचा सत्कार करण्यात येतो.
12 ऑक्टोबर रोजी हा अवॉर्ड्स शो आहे, त्या अगोदर या वाहिनीने त्याचा एक नवा कोरा प्रोमो जारी केला आहे. या प्रोमोमध्ये ‘अनुपमा’ मालिकेत शीर्षक भूमिका करणारी रूपाली गांगुली आणि ‘उडने की आशा’ मालिकेत सचिन ही व्यक्तिरेखा साकारणारा कंवर ढिल्लों सूत्रसंचालकाच्या रूपात दिसत आहेत. तर, ही जोडी आपल्या संवाद कौशल्याने कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी सज्ज झाली आहे. आपले हे लाडके कलाकार स्टार प्लसचा वारसा जपणाऱ्या या कार्यक्रमात आपली मोहकता घेऊन येतील. अनुपमाचे संस्कार आणि सचिनचे आकर्षक व्यक्तिमत्व यांचा रोचक संयोग मंचावर खचितच धमाल उडवून देईल!
हा प्रोमो शेअर करत चॅनलने लिहिले आहे, “आपके चहीते सितारों की अटेंडन्स है पक्की! क्या आप तैयार हैं, धमाल और मस्ती भरी शाम के लिए? देखीए स्टार परिवार अवार्ड्स-2025 12 अक्टूबर की शाम रात 7:00 बजे सिर्फ #StarPlus पर.”
https://www.instagram.com/reel/DPTTkWVDFP2/?igsh=cGNzeHB1eHNtZzBw
या अवॉर्ड शो मध्ये काही अत्यंत चमकदार परफॉर्मन्स बघायला मिळणार आहेत, वाहिनीच्या प्रसिद्ध मालिकांमधील गाजलेल्या व्यक्तिरेखा एकत्र येताना दिसणार आहेत, स्टार्सची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आणि तारांकित सोहळा प्रेक्षकांना नक्कीच मंत्रमुग्ध करून सोडेल. चाहते या दिमाखदार सोहळ्याची वाट बघत आहेत, कारण त्यांच्या आवडत्या मालिकांमधील कलाकार एकत्र येणार आहेत आणि ग्लॅमर, मनोरंजन आणि सुंदर क्षणांचा हा एक अविस्मरणीय सोहळा असणार आहे.
स्टार परिवार अवॉर्ड्स 2025 चे रेड कार्पेट टेलिव्हिजनवरील मोठमोठ्या स्टार्सनी झळकून उठले. ज्यातील काही स्टार प्लसवरील खूप प्रसिद्ध चेहरे आहेत. श्वेता तिवारी, उर्वशी धोळकिया, रोनित रॉय आणि करण मेहरा पासून ते दिव्यांका त्रिपाठी, तिचा नवरा विवेक दहिया यांच्यापर्यंत ही रजनी सुंदर आठवणी आणि ग्लॅमरचे चमचमत होती. शिवांगी जोशी, रागिणी खन्ना, अमर उपाध्याय, जय सोनी, जिया मानेक आणि करण पटेल यांसारख्या लोकप्रिय कलाकारांनी या झगमगाटात भर घातली. त्यांच्या सोबत वाहिनीचे आघाडीचे कलाकार- रूपाली गांगुली, कंवर ढिल्लों, समृद्धी शुक्ला, मेघा चक्रवर्ती, कमर राजपाल, नेहा हरसोरा, पुनीत चौकसे, आदिराज रॉय आणि दिव्या पाटील वगैरे तर होतेच. या सोहळ्यात संदीप्ता सेन, विशाल सिंह, अहम शर्मा, रिया कपूर, आश्लेषा सावंत आणि सुमित सचदेव यांनी देखील हजेरी लावली!
बघा, स्टार परिवार अवॉर्ड्स 2025, 12 ऑक्टोबर रोजी रात्री 7 वाजता फक्त स्टार प्लसवर!

