भारताकडून जगाकडे: *जिओ स्टुडिओज् १६ व्या शिकागो साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सादर करणार तीन वेगळ्या धाटणीचे चित्रपट, ज्यात "घमासान", "साली मोहब्बत" आणि "बन टिक्की" यांचा समावेश.*
मुंबई, दिनांक १ सप्टेंबर २०२५,
भारतातील आघाडीची कंटेंट पॉवरहाऊस कंपनी जिओ स्टुडिओज् जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवत आहे. प्रतिष्ठित १६ व्या शिकागो साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हल (CSAFF) (https://www.csaff.org/jio-studios) मध्ये जिओ स्टुडिओजच्या तीन चित्रपटांची अधिकृत निवड झाली आहे. ज्यात घमासान, साली मोहब्बत आणि बन टिक्की यांचा समावेश आहे.
हे चित्रपट “भारताकडून जगाकडे” या विशेष विभागात दाखवले जाणार आहेत. या विभागात तीन वेगळ्या शैलींचे चित्रपट आहेत, जे एकत्रितपणे भारतातील मनोरंजन क्षेत्राचा बहुआयामी व कलाकृतींनी भरलेले विश्व दर्शवणार आहेत. भारताच्या ग्रामीण जीवनाच्या मुळांपासून ते शहरी जीवनातील गुंतागुंतीपर्यंत तसेच भारतीय संस्कृती, जिद्द आणि बदलणारी ओळख चित्रपटातून दर्शवणार आहे.
हा महोत्सव १८ ते २१ सप्टेंबर २०२५ दरम्यान आयोजित केला जाणार असून, जिओ स्टुडिओज्चे चित्रपट प्रमुख स्लॉट्समध्ये झळकणार आहेत.
_*साली मोहब्बत*_ओपनिंग नाईट (१९ सप्टेंबर): टिस्का चोप्राच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट. ग्रामीण व शहरी भारताच्या बदलत्या सीमेवर घडणारी घरगुती हिंसा व विश्वासघाताच्या पार्श्वभूमीवर आधारीत आहे. ही एका छोट्या गावातील महिलेच्या संघर्षाची आहे, जी आपली ओळख पुन्हा मिळवते. चित्रपटात राधिका आपटे, अंशुमान पुष्कर, दिब्येंदु गांगुली आणि अनुराग कश्यप प्रमुख भूमिकेत आहेत. साली मोहब्बतचे निर्मिती ज्योती देशपांडे यांनी केली असून, नामांकित फॅशन स्टायलिस्ट ते निर्माता बनलेल्या मनीष मल्होत्राच्या निर्मितीतील हा पहिला चित्रपट आहे.
_*घमासान*_ सेंटरपीस फिल्म (२० सप्टेंबर): दिग्दर्शक तिग्मांशु धूलिया यांनी दिग्दर्शित केलेला हा ग्रामीण थ्रिलर भारताच्या हृदयस्थानी घेऊन जातो. हा चित्रपट एका तरूणाच्या राष्ट्र मूळाशी व त्याच्या भूतकाळाशी सुरू असलेल्या संघर्षाची कहाणी सांगतो. यात प्रतीक गांधी, अरशद वारसी आणि ईशिता दत्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. घमासानचे निर्माते ज्योती देशपांडे, पियूष सिंह, अश्विनी चौधरी, अभयानंद सिंह आणि सौरभ गुप्ता आहेत.
_*बन टिक्की*_ मार्की फिल्म (२१ सप्टेंबर): ही हृदयस्पर्शी कथा शहरी भारतात घडते. एका लहान मुलाच्या व त्याच्या आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांच्या प्रश्नांशी झुंजताना त्यांच्या कोमल भावनांचा आणि धैर्याचा आलेख मांडते. चित्रपटात शबाना आझमी, ज़ीनत अमान, अभय देओल, नुसरत भरुचा आणि रोहान सिंग प्रमुख भूमिकेत आहेत. बन टिक्कीचे निर्माते ज्योती देशपांडे, दिनेश मल्होत्रा, मरिज्के डीसूझा आणि मनीष मल्होत्रा असून, हा दिग्दर्शक फराझ आरिफ अन्सारी यांचा पहिला फीचर फिल्म आहे.
शिकागो साउथ एशियन फिल्म फेस्टिवल - दक्षिण आशियाई चित्रपटसृष्टीतील कला आणि सर्जनशीलतेला प्रकाशझोतात आणण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या CSAFF ने नेहमीच विविध आवाजांना आणि अनोख्या कथांना जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहे. यंदा जिओ स्टुडिओज्च्या प्रतिभावान दिग्दर्शक व कलाकारांबरोबरच्या सहकार्याने दक्षिण आशियाई चित्रपटांना जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या त्याच्या बांधिलकीवर पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे.
