* अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी ‘ब्राह्मण सेवा मंडळा’च्या शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सवात!*
*मुंबई, (सां. प्रतिनिधी) :* ब्राह्मण सेवा मंडळ, दादर (प) येथे १९२५ साली सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव शतकभराची परंपरा जपत दरवर्षी भक्तिभाव, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक जाणीव यांचा संगम घडवतो. भवानी शंकर रोडवरील या गणेशोत्सवात नाट्य, संगीत, व्याख्याने, कीर्तन, कविसंमेलने आणि विविध कलामैफिलींचे आयोजन केले जाते. प्रबोधन, ज्ञानवर्धन व मनोरंजन यांचा सुंदर समतोल राखणारा हा गणेशोत्सव यावर्षी शतकमहोत्सवी वर्ष साजरा करीत असून सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुले आहेत.
या शृंखलेत आता एक आगळावेगळा उपक्रम होणार आहे ‘संकर्षण via स्पृहा’. आज १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी हा विशेष कार्यक्रम सादरकरतील. दादरमधील चोखंदळ गणेशभक्त रसिकांसोबत कवितांपासून गाणी, किस्से, आठवणी आणि खास गप्पांची मैफिल ते सादर करतील. त्यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून विनय चौलकऱे आणि गांधीर जोग यांची साथ असणार आहे.
यासोबतच दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा. पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी निमित्ताने माणिक वर्मा यांच्या सुमधुर गीतांवर आधारित ‘हसले मनी चांदणे’ हा कार्यक्रम सादर होईल. माणिक वर्मा यांच्या कन्या वंदना गुप्ते, राणी वर्मा आणि इतर सदस्य उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सादर होणार आहे.

