ऋतिक रोशन आणि एनटीआर अभिनीत YRF च्या वॉर 2 ने उत्तर अमेरिकेत रचला नवा विक्रम — सर्वात वेगात $100K प्री-सेल्स पार करणारी भारतीय चित्रपट ठरली!
YRF स्पाय युनिव्हर्सची वॉर 2 ही यंदाची सर्वात मोठी भारतीय चित्रपट असून जगभरात प्रेक्षकांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते आहे! या चित्रपटाच्या भोवती असलेला हायप आणि क्रेझ अधोरेखित करत, वॉर 2 ने आज सकाळी उत्तर अमेरिकन मार्केटमध्ये इतिहास रचला — ही $100,000 अॅडव्हान्स तिकीट विक्री पार करणारी सर्वात वेगवान भारतीय चित्रपट ठरली आहे!
हे यश वॉर 2 ने अवघ्या सात तासांत गाठले, ज्यामुळे तिने याआधीचा विक्रमधारक एनटीआरचा देवारा चित्रपट मागे टाकला, ज्याला ही कामगिरी गाठण्यासाठी 11 तास 37 मिनिटे लागली होती.
अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर 2 मध्ये कियारा अडवाणी प्रमुख महिला भूमिकेत आहे. या वर्षातील सर्वात भव्य भारतीय चित्रपटासाठी निर्मात्यांनी "कमी दाखवा, अधिक प्रभाव" ही नीती अवलंबली आहे, जेणेकरून चित्रपटातील प्रत्येक महत्त्वाचा क्षण प्रेक्षकांना थेट थिएटरमध्येच अनुभवता येईल.
वॉर 2 14 ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे.