महाराष्ट्राची मुलगी अदितीला मिळाले बॉलीवूड स्टार भाग्यश्रीचे समर्थन
सुपर डान्सर चॅप्टर 5 मध्ये ‘डान्स का दरबार’ थीम असलेल्या आगामी भागात सातारा, महाराष्ट्राहून आलेली अदिती ‘कहना ही क्या’ गाण्यावर एक चित्तथरारक परफॉर्मन्स देऊन मंच उजळून टाकताना दिसेल. तिच्या डौलदार हालचाली, नेमकेपणा आणि भावनात्मक अभिव्यक्ती पाहून परीक्षक शिल्पा शेट्टी, मर्झी पेस्तनजी आणि गीता कपूर थक्क झाले. त्यात बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्रीने व्हिडिओ कॉल द्वारे या भागात सहभागी होत अदितीचे तोंड भरून कौतुक केले.
या सीझनमधले तिचे एकापेक्षा एक सुंदर परफॉर्मन्स पाहून मूळची सांगलीची भाग्यश्री तिचे कौतुक करताना म्हणाली, “अदिती, तू काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहेस! साताऱ्याहून तू थेट या प्रतिष्ठित मंचावर जाऊन पोहोचलीस. तू ज्या प्रकारे नाचलीस ते अद्वितीय होते. तू साताऱ्याची शान वाढवलीस. सातारा आणि माझे गाव सांगली या दोन्हीच्या वतीने मी तुला मनःपूर्वक शुभेच्छा देते. महाराष्ट्राची मुलगी, अदिती, आता हा शो जिंकूनच परत ये!”
गीता कपूर म्हणाली, “मोठमोठे कलाकार तिला समर्थन देत आहेत. तिचे फॉलोइंग जबरदस्त आहे!” वाढते समर्थन मिळवणारी आणि अतुलनीय प्रतिभा असलेली अदिती प्रेक्षकांचे मन तर जिंकत आहेच, पण अंतिम फेरीची स्पर्धक होण्यासाठीची आपली तयारी सिद्ध करत आहे.”
बघा, सुपर डान्सर चॅप्टर 5 दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!