Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माझ्या जुळ्या बहिणीचे मला अस्तित्वच माहीत नव्हते, माझी तिची भेट वयाच्या पाचव्या वर्षी झाली

 माझ्या जुळ्या बहिणीचे मला अस्तित्वच माहीत नव्हते, माझी तिची भेट वयाच्या पाचव्या वर्षी झाली,' सांगत आहेत म्हणते ‘छोरियाँ चली गाँव’ मधील स्पर्धक समृद्धी ऊर्फ चिंकी-मिंकी.


झी टीव्हीवरील ‘छोरियाँ चली गाँव’ हा रिअ‍ॅलिटी शो आपल्या सेलिब्रिटी स्पर्धकांच्या झगमगाटाच्या पलीकडचे खरे आयुष्य उलगडून दाखवत आहे. रणविजय सिंघाच्या सूत्रसंचालनाखाली सुरु असलेल्या या शोमध्ये अनिता हसानंदानी, ऐश्वर्या खरे, अंजुम फकीह, कृष्णा श्रॉफ, डॉली जावेद, एरिका पॅकार्ड, रमीत संधू, रेहा सुखेजा, सुमुखी सुरेश आणि लोकप्रिय जुळ्या बहिणी – समृद्धी आणि सुरभी मेहरा (चिंकी-मिंकी) अशा अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे. बामुलिया गावात ग्रामीण जीवन अनुभवताना या शहरातल्या सुंदऱ्या स्वतःतील आणि एकमेकींतील नवे पैलू शोधत आहेत.


अशाच एका हृदयस्पर्शी क्षणी समृद्धीने आपल्या लहानपणातील एक अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक आठवण प्रथमच उघड केली. तिने सांगितले की आयुष्याच्या पहिल्या 2-3 वर्षांपर्यंत तिला स्वतःची एक जुळी बहीण - सुरभी आहे हेच माहिती नव्हते. पारंपरिक विचारसरणी असलेल्या कुटुंबात वाढताना या जुळ्या बहिणींना एकमेकींपासून दूर ठेवण्यात आले होते. मात्र त्यांच्या आईने घरातील निर्बंधांविरोधात उभे राहत लढा दिला आणि त्यानंतरच समृद्धीची आपल्या बहिणीची – सुरभीसोबत – पहिल्यांदा भेट झाली, तीही वयाच्या पाचव्या वर्षी. त्या दिवसापासून दोघींचे नाते अतूट राहिले आहे.


समृद्धी म्हणाली, "आमचे कुटुंब इतके पारंपरिक होते की फक्त आम्ही दोघी मुली आहोत म्हणून माझ्या बहिणीला घरापासून दूर पाठवण्यात आले. मला तर हेही माहीत नव्हते की माझी एक जुळी बहीण आहे. त्या सुरुवातीच्या वर्षांत तिला आईचे प्रेमसुद्धा मिळाले नाही. पण आमच्या आईने आमच्यासाठी आवाज उठवला. संपूर्ण कुटुंबाशी भांडून ती आम्हांला पुन्हा एकत्र घेऊन आली. मी माझ्या बहिणीला पहिल्यांदा भेटले तेव्हा मी पाच वर्षांची होते. ती घरी आली तेव्हा मला हेही ठाऊक नव्हते की माझी एक अशी बहीण आहे जी अगदी माझ्यासारखी दिसते. त्या दिवसापासून आमचे नाते कधीच तुटलेले नाही. आमच्यासाठी आमची आईच सगळंकाही आहे."


‘छोरियाँ चली गाँव’मधील हे क्षण आपल्याला सतत हेच सांगतात की प्रत्येक सेलिब्रिटीच्या प्रवासातही वेदना असतात आणि त्यावर मात करण्याची ताकदही. आणि हेच खरे, चिकाटीने भरलेले, न सांगितलेले अनुभवच या शो ला प्रेक्षकांच्या मनाशी इतके खोलवर जोडतात.

अशाच भावनांनी भरलेल्या कहाण्यांसाठी, नक्की पहा ‘छोरियाँ चली गाँव’ दररोज रात्री 9:30 वाजता फक्त झी टीव्हीवर!



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.