शिल्पा शेट्टी आणि परितोष त्रिपाठी स्पर्धक अप्सराचा शिक्षण खर्च करणार
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपरडान्सर चॅप्टर 5 हा सीझन त्यातील धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि स्पर्धकांच्या भावनिक प्रवासाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या आवृत्तीत खास करून आई आणि त्यांच्या मुलांमधील भावपूर्ण नात्याचा गौरव केला आहे. आगामी भागात आपल्या मुलाचे कर्तृत्व मोठ्या मंचावर बघण्यासाठी त्यांच्या पित्यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.
अप्सरा नामक स्पर्धकाच्या परफॉर्मन्स दरम्यान अत्यंत भावपूर्ण क्षण प्रेक्षकांनी अनुभवले. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत रिक्शा चालवणाऱ्या, खूप कष्ट घेणाऱ्या आपल्या पित्याला तिने या परफॉर्मन्समधून आदरांजली वाहिली. या परफॉर्मन्सने सगळ्यांना हेलावून सोडले. अप्सराच्या वडिलांना क्वचितच तिचा डान्स लाईव्ह बघायला मिळतो. त्यामुळे हा क्षण खूप भावनिक होता. तिला इतक्या निष्ठेने आणि पॅशनने परफॉर्म करताना पाहून त्यांचे डोळे भरून आले. हे दृश सर्वांना हेलावून टाकणारे होते.
अप्सराला परीक्षक शिल्पा शेट्टीने उभे राहून टाळ्या वाजवून जोरदार दाद दिली आणि सीडीची सलामी देखील दिली. पण त्यानंतर जे घडले, ते खरोखर अविस्मरणीय होते. अप्सराच्या वडिलांनी त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नाबद्दल आणि आपल्या मुलीच्या डान्स प्रशिक्षणासाठी त्यांना कराव्या लागणाऱ्या महत्प्रयासांविषयी सांगितले, तेव्हा होस्ट परितोष त्रिपाठी म्हणजे मामाजीने झटकन मदतीचा हात पुढे केला. ‘एका संपूर्ण वर्षाची फी माझ्याकडून’ असे असे म्हणत त्यांनी अप्सराच्या प्रशिक्षणाचा वर्षभराचा खर्च उचलला.
त्याची उदारता पाहून प्रेरित होऊन शिल्पा देखील ही खातरजमा करण्यासाठी पुढे झाली की, परिस्थितीमुळे अप्सराची स्वप्ने मर्यादित राहणार नाहीत. परितोषचे कौतुक करत ती म्हणाली, “तू मलाही प्रेरित केलेस. एक से भले दो. तू या वर्षाचे काम केलेस मी दहावीपर्यंत करेन. अप्सराला जे काही शिकायचे असेल, त्याची जबाबदारी माझी.” असे म्हणून शिल्पा शेट्टीने अप्सराचा दहावीपर्यंतचा खर्च प्रायोजित केला.
हा भावपूर्ण एपिसोड त्यातील अविस्मरणीय परफॉर्मन्स आणि या शोच्या परिवाराने केलेल्या मदतीबद्दल नेहमी लक्षात राहील.
अवश्य बघा सुपर डान्सर चॅप्टर 5 चा हा विशेष भाग, या शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!

