Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

यश राज फिल्म्सने 'वॉर 2' मधील ग्रूवी रोमँटिक गाणं 'आवन जावन' केलं रिलीज!

 हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची जबरदस्त केमिस्ट्री आणि सहज स्टाइल इंटरनेटवर झाली व्हायरल, यश राज फिल्म्सने 'वॉर 2' मधील ग्रूवी रोमँटिक गाणं 'आवन जावन' केलं रिलीज!


यश राज फिल्म्स ने आज त्यांच्या बहुचर्चित चित्रपट 'वॉर 2' मधील पहिलं गाणं 'आवन जावन' रिलीज केलं आहे. हे एक ग्रूवी आणि रोमँटिक ट्रॅक आहे, ज्यामध्ये हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी अत्यंत कूल अंदाजात झळकत आहेत. या गाण्याला विशेष बनवणारं कारण म्हणजे 'ब्रह्मास्त्र' मधील हिट गाणं 'केसरिया' बनवणारी टीम पुन्हा एकत्र आली आहे — दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या पुढाकारामुळे.


या गाण्याचं संगीत दिलं आहे प्रीतम यांनी, शब्द लिहिले आहेत अमिताभ भट्टाचार्य यांनी आणि आवाज दिला आहे अरिजीत सिंह यांनी. 'आवन जावन' हे आजच्या काळातलं नवीन रोमँटिक अँथम बनत आहे. या गाण्यातील फीमेल वोकल्स युवा आणि बहुपरिक्षित गायिका निकिता गांधी चे आहे।



सध्या 'आवन जावन' हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हृतिक आणि कियाराची केमिस्ट्री व त्यांचा सहज वावर प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. वायआरएफ ने काल जाहीर केलं होतं की हे गाणं कियारा अडवाणी च्या वाढदिवसानिमित्त तिला आणि तिच्या चाहत्यांना खास भेट म्हणून देण्यात येणार आहे. आता हे गाणं प्रदर्शित झाल्यावर, याला मिळणारा प्रतिसाद पाहता हे स्पष्ट होतंय की 'आवन जावन' आधीच सुपरहिट ठरलं आहे.


येथे पाहा गाणं:  https://youtu.be/enjkcCdAlXc


वॉर 2 या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे आणि निर्मिती आदित्य चोप्रा यांची आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.