Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हृतिक रोशन ला हवे आहे की संपूर्ण जग थिरकावे वायआरएफ च्या ‘वॉर 2’ मधील ‘आवन-जावन’ गाण्यावर,

 हृतिक रोशन ला हवे आहे की संपूर्ण जग थिरकावे वायआरएफ च्या ‘वॉर 2’ मधील ‘आवन-जावन’ गाण्यावर, ग्लोबल डान्स कॅम्पेनला सुरुवात केली


यशराज फिल्म्सने त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वॉर 2’ मधील पहिले गाणे ‘आवन-जावन’ नुकतेच प्रदर्शित केले आहे. या गाण्यात सुपरस्टार हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी त्यांच्या आजवरच्या सर्वात कूल अवतारात पाहायला मिळतात. सोशल मीडियावर हे गाणे सध्या चांगलेच ट्रेंड होत असून, हृतिक आणि कियाराची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडत आहे.


प्रेक्षकांना सुखद धक्का देत, हृतिक रोशनने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी सर्व जगाला ‘आवन-जावन’ या रोमँटिक ट्रॅकवर डान्स करण्याचे आवाहन केले आहे! त्याने एक जागतिक पातळीवरचा कॅम्पेन सुरू केला आहे, जिथे त्यांनी सांगितले की हे हुकस्टेप अगदी सहज  सोपी आहे आणि कोणीही यामध्ये भाग घेऊ शकतो.



हृतिक रोशन म्हणाला "हाय गाइज! मी आहे हृतिक रोशन आणि माझं नवीन गाणं 'आवन-जावन' वॉर 2 मधून आऊट झालंय. YRF एक हुक स्टेप कॉन्टेस्ट करत आहे. या गाण्याचं हुक स्टेप खूपच सोपं आहे, तर करा 'आवन-जावन' हुकस्टेप, कबीर आणि काव्याच्या स्टाइलमध्ये, आणि सहभागी व्हा या कॉन्टेस्टमध्ये. एक मजेदार रील तयार करा, @yrf ला टॅग करा आणि #AavanJaavan हा हॅशटॅग वापरा. तुमचा बेस्ट द्या, कारण मी काही लकी विजेत्यांना लवकरच भेटणार आहे! चला तर मग, धमाल रील्स बनवा आता!"

📲 व्हिडीओ येथे पाहा: https://www.instagram.com/reel/DMzdh7qo2xW/?igsh=eTM0a3FvcXNoazF4


काल सकाळीच प्रदर्शित झालेल्या ‘आवन-जावन’ या गाण्याने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. गाण्याच्या एनर्जी आणि ग्रूव्हिंग बीट्समुळे जगभरातील चाहते या गाण्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.


‘वॉर 2’ चे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे आणि निर्मिती आदित्य चोप्रा यांची आहे. ह्या सिनेमात भारताचे दोन मेगास्टार्स — हृतिक रोशन आणि एनटीआर  — एकमेकांविरुद्ध एक जबरदस्त मिशनवर भिडणार आहेत. दोघेही सुपर एजंट्स भारतासाठी युद्ध करणार आहेत — देश प्रथम, बाकी नंतर!


‘वॉर 2’ 14 ऑगस्ट 2025 रोजी हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.