Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

‘वॉर २’च्या प्रमोशनमध्ये ऋतिक आणि एनटीआर एकत्र दिसणार नाहीत! YRF ची भन्नाट प्रचार युक्ती

 ‘वॉर २’च्या प्रमोशनमध्ये ऋतिक आणि एनटीआर एकत्र दिसणार नाहीत! YRF ची भन्नाट प्रचार युक्ती

यशराज फिल्म्स (YRF) ने त्यांच्या स्पाय युनिव्हर्स चित्रपटांच्या प्रचारासाठी नेहमीच हटके आणि लक्षवेधी स्ट्रॅटेजी वापरल्या आहेत. आता ‘वॉर २’संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे – ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर हे दोघं प्रचार काळात एकमेकांपासून लांब ठेवले जाणार आहेत!


या चित्रपटात ऋतिक आणि एनटीआर यांचं पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर टोकदार आमनेसामना होणार आहे. आणि हाच क्षण खास राखण्यासाठी वायआरएफ ने ठरवलंय की दोघं कधीच एकत्र स्टेजवर, व्हिडिओमध्ये किंवा प्रमोशन इव्हेंटमध्ये दिसणार नाहीत.



एक वरिष्ठ ट्रेड सूत्र सांगतात, “वॉर २ चा मुख्य यूनिक सेलिंग पॉइंट म्हणजे ऋतिक आणि एनटीआर यांच्यातील तीव्र टक्कर. ती भावना लोकांपर्यंत जशीच्या तशी पोहोचावी म्हणून वायआरएफ दोघांना एकत्र प्रमोट करणार नाही. प्रेक्षकांना आधी ही भिडंत सिनेमात पाहायची आहे – त्यानंतरच त्यांना ऋतिक-एनटीआरची मैत्रीप्रेमाची झलक मिळावी, अशी ही कल्पक संकल्पना आहे.”


वायआरएफ पूर्वीही अशा क्रिएटिव्ह मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरत आले आहे. पहिल्या ‘वॉर’मध्येही ऋतिक आणि टायगर फक्त सक्सेस पार्टीसाठी एकत्र आले होते. ‘पठाण’च्या प्रचारावेळी शाहरुख खानने कुठल्याही इव्हेंटला हजेरी न लावता फक्त सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे चित्रपटाचं प्रमोशन केलं – आणि त्याचा परिणाम म्हणजे ब्लॉकबस्टर यश.


सूत्र पुढे म्हणतात, “वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा फोकस नेहमी रहस्य टिकवून ठेवण्यावर असतो. त्यासाठीच ते कलाकारांना प्रमोशन दरम्यान स्क्रिप्ट उघड होऊ नये म्हणून ‘नो इंटरव्ह्यू’ धोरण वापरतात.”


‘वॉर २’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहेत. हा सिनेमा १४ ऑगस्ट २०२५ रोजी जगभरात आइमैक्स फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी तिच्या सर्वात नविन अवतारात दिसणार असून ती देखील वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा भाग बनणार आहे. चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.