यशराज फिल्म्सने ‘सैयारा’च पुढील गाणं ‘धुन’ केलं प्रदर्शित, अरिजित सिंग, मिथून आणि मोहित सूरी यांचं स्वप्नवत संगीतिक पुनर्मिलन!
‘तुम ही हो’ (आशिकी 2) सारखी ऐतिहासिक चार्टबस्टर गाणी देणारे अरिजित सिंग, मिथून आणि मोहित सूरी ही हिट संगीतिक त्रिकूट पुन्हा एकदा एकत्र आले आहेत सैयाराच्या पुढील गाण्यासाठी – ‘धुन’, जे आज यशराज फिल्म्सने प्रदर्शित केलं आहे!
🎵 गाणं पाहण्यासाठी क्लिक करा: https://www.youtube.com/watch?v=cUmUOb7j3dc
मोहित सूरी आणि मिथून यांची मैत्री आणि संगीतिक सहकार्याला आता २० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या सहकार्याची सुरुवात २००५ मध्ये झहर आणि कलयुग पासून झाली. त्यांनी मर्डर 2, आशिकी 2, एक विलन, हमारी अधूरी कहानी, हाफ गर्लफ्रेंड, मलंग आणि आता सैयारा सारख्या हिट संगीत अल्बमवर एकत्र काम केलं आहे.
अरिजित सिंग, जे भारतातील सर्वोत्तम गायन प्रतिभांपैकी एक मानले जातात, यांनी मोहित सूरीसोबत अनेक आत्म्याला स्पर्शणारी गाणी गायली आहेत – तुम ही हो, चाहूं मैं या ना, हम मर जाएंगे (आशिकी 2), हमदर्द (एक विलन), हमारी अधूरी कहानी, फिर भी तुमको चाहूंगा (हाफ गर्लफ्रेंड), चल घर चलें (मलंग), आणि आता धुन (सैयारा).
सैयारा ही एक अत्यंत अपेक्षित प्रेमकथा आहे, ज्यामध्ये पहिल्यांदाच यशराज फिल्म्स आणि मोहित सूरी एकत्र आले आहेत. या चित्रपटाला सध्या नवोदित कलाकारांची गूढ केमिस्ट्री आणि प्रभावी अभिनय यामुळे भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.
या चित्रपटामध्ये अहान पांडे यशराज फिल्म्सचा नवा हिरो म्हणून पदार्पण करत आहे, तर अनीत पड्डा, जी बिग गर्ल्स डोंट क्राई मालिकेतून खूप लोकप्रिय झाली, तिला नवी वायआरएफ हिरोईन म्हणून सादर केली जात आहे.
सैयारा हे वर्षातील सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम ठरत आहे. आतापर्यंत रिलीज झालेली सर्व गाणी – सैयारा, जुबिन नौटियालचं बर्बाद , विशाल मिश्राचं तुम हो तो, सचेत-परंपराचं हमसफर, आणि आता धुन – ही सगळी गाणी भारतातील म्युझिक चार्ट्सवर धुमाकूळ घालत आहेत.
यशराज फिल्म्स, ने गेल्या ५० वर्षांत यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली भारताला अनेक संस्मरणीय प्रेमकथा दिल्या, आणि मोहित सूरी, जो आपल्या २०व्या सिनेमिक वर्षात आहे, हे १८ जुलै २०२५ रोजी सैयारा हे चित्रपट जगभरात प्रदर्शित करत आहेत.