Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टिझर प्रदर्शित*

 *१९ सप्टेंबरला फुटणार आतली बातमी* 

*'आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टिझर प्रदर्शित*



पती पत्नीचं नातं हे प्रेम आणि विश्वास यावर टिकून असतं. काही कारणाने याच नात्यात कटुता येऊन जोडीदाराच्या खुनाची सुपारी देण्याची वेळ आलेल्या एका नवऱ्याची आणि सुपारी घेणाऱ्या  व्यक्तीची उडणारी त्रेधातिरपीट दाखविणारा 'आतली बातमी फुटली’ या आगामी मराठी चित्रपटाचा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेते मोहन आगाशे यांनी संवादातून आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या देहबोलीतून या टिझरची रंगत वाढवली आहे. केवळ शक्यतांचा अंदाज बांधून खुनाच्या सुपारी भोवती फिरणाऱ्या चित्रपटाच्या टिझरमधून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा खेळ असा काहीसा गमतीशीर मामला प्रथमदर्शनी वाटतोय. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार 'आतली बातमी फुटली' हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. येत्या १९ सप्टेंबरला हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.  


ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या तिघांसोबत विजय निकम, भारत गणेशपुरे,आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदि कलाकारांची जमून आलेली भट्टी आणि खिळवून ठेवणारी कथा असलेला 'आतली बातमी फुटली’ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ट्रीट ठरणार आहे. या चित्रपटाची निर्मिती विशाल पी.गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सहनिर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. 



'आतली बातमी फुटली’ चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी,जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'आतली बातमी फुटली’ चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.