वायआरएफ चा ‘सैयारा’ स्पॉटीफाय ग्लोबल टॉप ५० च्या चार्टमध्ये टॉप ७ मध्ये पोहोचणार पहिल बॉलिवूड गाणं ठरलं !
यशराज फिल्म्सच्या मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ या चित्रपटाने इतिहास रचला आहे – स्पॉटीफाय ग्लोबल टॉप ५० चार्टमध्ये टॉप ७ मध्ये पोहोचणारे पहिलं बॉलिवूड गाणं ठरलं आहे!
अहान पांडे आणि अनीत पड्ढा यांच्या पदार्पणाने सजलेली ही फिल्म, २000 मधील ‘कहो ना प्यार है’ नंतरचा सर्वात मोठा डेब्यू मानला जातोय. वायआरएफ चे सीईओ अक्षय विधानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि तो बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचत आहे.
‘सैयारा’ने फक्त ४ दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे आणि यामुळे आहान आणि अनीत हे दोघंही झटपट जेन ज़ी सुपरस्टार्स बनले आहेत.
चित्रपटाचं संगीत एल्बम देखील लोकांच्या मनावर राज्य करतंय –
तनिष्क आणि फ़हीम-अर्सलान यांचं टायटल ट्रॅक
जुबिन नौटियाल व शिल्पा राव यांचं ‘बर्बाद (रिप्राइज़)’
विशाल मिश्रा यांचं ‘तुम हो तो’
सचेत-परंपरा यांचं ‘हमसफर’
मिथुन व अरिजीत सिंग यांचं ‘धुन’
श्रेय घोषाल यांचं ‘सैयारा रिप्राइज़’
कालच्या रात्री, या एल्बममधील ६ गाणी स्पॉटीफाय ग्लोबल टॉप ५० चार्टमध्ये टॉप १० मध्ये होती:
टायटल ट्रॅक – नंबर 1 (5 दिवसांपासून)
धुन – नंबर 3
रिप्राइज़ – नंबर 4
हमसफर – नंबर 6
बर्बाद – नंबर 7
तुम हो तो – नंबर 9
‘सैयारा’ने २४ तासांत भारतात ३.६१ मिलियन स्ट्रीम्स मिळवून सर्वाधिक ऐकलेलं एकदिवसीय बॉलिवूड गाणं बनण्याचा विक्रम केला. ग्लोबली ३.८७ मिलियन स्ट्रीम्स झाल्या.
स्पॉटीफाय ग्लोबल टॉप ५० चार्टमध्ये सैयारा #७ पर्यंत पोहोचलं, हे यश मिळवणारे पहिलं बॉलिवूड गाणं ठरलं आहे. याआधी हनुमानकाइंड चं ‘बिग डोग’ हे सिंगल #७ वर होतं पण ते बॉलिवूड ट्रॅक नव्हतं.
वायआरएफ चे डिजिटल उपाध्यक्ष आनंद गुरनानी म्हणाले,“संपूर्ण जगभरातील हिंदी संगीतप्रेमी सैयाराच्या संगीताने भारावून गेले आहेत. हे गाणं लोकांच्या मनाच्या इतक्या खोलवर पोहोचलंय की ते ग्लोबल हिट्ससोबत स्पर्धा करतंय, ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.”
सोशल मीडियावर आता #OnLoop चा ट्रेंड सुरू आहे – लोक सैयारा टायटल ट्रॅकला जगातलं नंबर 1 गाणं बनवण्याची मागणी करत आहेत.
अनन्या पांडे हिनं लिहिलं:“सैयारा ऑन स्पॉटीफाय ग्लोबल टॉप ५० ! किती जबरदस्त आहे हे! आता हे नंबर 1 व्हावं म्हणून मी माझा वाटा उचलतेय.. चला इंडिया!”
गाण्याचे संगीतकार तनिष्क बागची म्हणाले: “चला, सैयारा जगातलं नंबर वन गाणं बनवूया. हे आपल्यासाठी खूप अभिमानाचं क्षण ठरेल!”
वायआरएफ म्यूजिक , गेल्या २० वर्षांपासून स्वतःची ओळख निर्माण करत, भारतातील टॉप ५ म्युझिक लेबल्सपैकी एक ठरलं आहे. त्यांचं मूळ IP ठेवण्याचं धोरण आणि दर्जेदार संगीतामुळे ते कायम लोकप्रिय राहिलं आहे.