यश राज फ़िल्म्स कडून वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटाचा – वॉर 2 – ट्रेलर प्रदर्शित; ऋतिक रोशन, एनटीआर आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत
यश राज फ़िल्म्स ने आज वर्षातील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतीक्षित चित्रपट वॉर 2 चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात सुपरस्टार्स ऋतिक रोशन, एनटीआर जूनियर आणि कियारा अडवाणी झळकणार आहेत.
भारतीय सिनेमातील दोन दिग्गज कलाकार – ऋतिक रोशन आणि एनटीआर – यांच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचा गौरव साजरा करत आज २५ जुलै रोजी हा ट्रेलर खास जाहीर करण्यात आला आहे.
अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर 2 ही वाईआरएफ स्पाय युनिव्हर्स मधील एक महत्त्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटात दोन महाशक्तीशाली व्यक्तीरेखा एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत – आणि ही भिडंत इतकी तीव्र आणि थरारक आहे की ती प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली जाईल.
ट्रेलर येथे पाहा: https://youtu.be/mjBym9uKth4
वॉर 2, १४ ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातल्या चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी प्रमुख महिला भूमिका साकारत आहे.
