टीव्हीवरील पुष्पासाठी सज्ज व्हा: 'जमाई नं. 1' मध्ये अभिषेक मलिकचा अल्लू अर्जुन प्रेरित लूक ठरणार धडाकेबाज!
झी टीव्हीवरील ‘जमाई नं. 1’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांसाठी एक उत्कंठावर्धक आणि भावनांनी भरलेला ट्विस्ट आणण्याची तयारी केली आहे, कारण नील (अभिषेक मलिक) देवी कालीचे रूप धारण करणार आहे — जो पुष्पा 2 मधील अल्लू अर्जुनच्या लूकने प्रेरित आहे. हिंदी टेलिव्हिजनवर प्रथमच एक प्रमुख पुरुष पात्र एका दैवी आणि शक्तिशाली अवतारात प्रकट होणार आहे, जो सिनेमॅटिक फ्लेअर आणि भावनिक गहरेपणाचा संगम आहे. रिद्धी (सिमरन कौर) चे अपहरण आणि तिला वाचवण्यासाठी नीलने सुरू केलेले धाडसी मिशन यामुळे कथा अधिक गहन होत जाते, आणि त्यामुळे प्रेक्षकांसमोर एक जबरदस्त नाट्य सादर होणार आहे.
या अप्रतिम रूपांतरासाठी अभिषेकचा मेकओव्हर ही काही साधी गोष्ट नव्हती — त्यासाठी रोज सुमारे दोन तास लागत होते, ज्यामध्ये पूर्ण शरीरावर पेंट, डोळ्यांचा नाट्यमय मेकअप, भव्य मंदिरात वापरले जाणारे दागिने आणि पारंपरिक साडीचा समावेश होता. पण सगळ्यात खास गोष्ट म्हणजे काय माहिती आहे? अभिषेकने या अवतारात एक स्टायलिश, दमदार अॅक्शन सीक्वेन्सदेखील केला आहे, जिथे त्याने याच पोशाखात लढत भक्ती आणि थरारक नाट्य एकत्र मांडले आहे — असा प्रयोग यापूर्वी भारतीय टेलिव्हिजनवर कधीही पाहायला मिळाला नव्हता.
अभिषेक म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचं तर जेव्हा मी या ट्रॅकबद्दल ऐकलं तेव्हा मी खूप उत्साहित झालो. मला काली मातेच्या रूपात सादर व्हायचं होतं. माझ्या अंगावर काटा आला. हा लूक पुष्पा 2 मधील अल्लू अर्जुनच्या धडकी भरवणाऱ्या, रांगड्या आणि शक्तिशाली रूपासारखा होता. आम्ही लूक टेस्ट केला आणि प्रतिसाद जबरदस्त होता. सेटवर सगळ्यांना तो खूप आवडला. आमच्या निर्मात्यानेही मला फोन करून सांगितलं, ‘हा लूक फक्त तुझ्यासाठीच बनलाय.’ माझ्यासाठी हे खूप मोठं होतं. हे पूर्णपणे काहीतरी वेगळं आहे — असं काहीतरी जे भारतीय टेलिव्हिजनवर कधीच पाहायला मिळालं नाही. हा ट्रॅक खूप जबरदस्त आहे आणि यातला अॅक्शन सीक्वेन्स तर त्याला अजूनच थरारक बनवतो. ते दृश्य भारतीय सिनेमातील भव्य, स्टायलिश अॅक्शन सीनसारखा आहे. हे रूपांतर मुळातच इतकं जोरदार होतं की मला या अवतारात सजायला दररोज जवळपास दोन तास लागायचे — बॉडी पेंटपासून ते जड साडी आणि मंदिरातले दागिने घालण्यापर्यंत. सगळं अगदी बारकाईने आणि मेहनतीने केलं गेलं. त्या लूकमध्ये अॅक्शन सीक्वेन्स करताना थकायला नक्कीच झालं, पण अनुभव खूप सशक्त होता.”
तो पुढे म्हणाला, “नक्कीच, मी आजवर शूट केलेल्या सर्वात आव्हानात्मक आणि सर्जनशील दृष्यांपैकी हे एक आहे. हा लूक हिंदी मनोरंजन वाहिन्यांवर प्रेक्षकांनी पाहिलेल्या कुठल्याही सीनपेक्षा वेगळा आहे. ‘जमाई नं.1’ ने नेहमीच काहीतरी हटके केलं आहे आणि हा ट्रॅक त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. या सीनचं शूटिंग पूर्ण होण्यासाठी आम्हाला दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ लागला आणि प्रत्येकवेळी पेंट आणि मेकअप काढणं सुद्धा तितकंच कठीण होतं — पण आम्ही त्यात जी भावना, ऊर्जा आणि मेहनत दिली आहे ती प्रेक्षक नक्कीच अनुभवतील अशी मला आशा आहे.”
आता जेव्हा अभिषेक या शक्तिशाली सीनचा भाग होण्यासाठी सज्ज आहे, तेव्हा प्रेक्षकांसाठी हे पाहणे अत्यंत रंजक ठरेल की नील रिद्धीला वाचवण्यासाठी काली मातेच्या अवतारात कोर्टरूममध्ये प्रवेश करताना काय घडेल — कारण जज त्याला जन्मठेपेची शिक्षा देणार आहेत. पण तो आत्मसमर्पण करणार का? की रिद्धी त्याच्यावर लागलेल्या गंभीर आरोपांपासून त्याला वाचवण्यासाठी काही मार्ग काढणार?
हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ‘जमाई नं.1’ दररोज रात्री 10.45 वाजता, फक्त झी टीव्हीवर!