Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सिनेमा क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानाबद्दल आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

 सिनेमा क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानाबद्दल आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!


बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे!



"या प्रतिष्ठित कलाकार, तंत्रज्ञ आणि व्यावसायिकांना अकादमीत सामील करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे," असे अकादमीचे सीइओ बिल क्रेमर आणि अध्यक्ष जॅनेट यांग यांनी सांगितले. "चित्रपट निर्मिती आणि संपूर्ण चित्रपट उद्योगाबाबतच्या त्यांच्या बांधिलकीमुळे या अत्यंत प्रतिभावान व्यक्तींनी जागतिक चित्रपट समुदायात अमीट योगदान दिले आहे."


मोशन पिक्चर्स आणि सिनेमा क्षेत्रातील योगदानासाठी जगभरातील नावाजलेल्या कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. आयुष्मान आता गिलियन अँडरसन, एरियाना ग्रांडे, कमल हासन, मिकी मॅडिसन, जेरेमी स्ट्रॉन्ग, कीरन कल्किन यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या यादीत सामील झाला आहे.


आयुष्मान खुराना ला नेहमीच त्यांच्या वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या सिनेमासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. त्यांनी नेहमीच आपली कला समाज परिवर्तनासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी वापरली आहे. त्यांना टाइम मॅगझिन कडून दोन वेळा गौरवण्यात आले आहे – टाइम १०० इम्पैक्ट अवार्ड्स 2023 साठी आणि प्रतिष्ठित टाइम १०० यादीत, ज्यामध्ये त्यांना जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून ओळख देण्यात आली आहे! आयुष्मान हे यूनिसेफ इंडिया चे राजदूत आहेत आणि ते मुलांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.