यशराज फिल्म्स चा चित्रपट वॉर २ आइमैक्स मध्ये जागतिक स्तरावर १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार; नवीन पोस्टर्ससह ५० दिवसांची उलटी गणती सुरू।
यशराज फिल्म्सने (YRF) आपल्या बहुप्रतिक्षित हाय-ऑक्टेन अॅक्शन थ्रिलर वॉर २ च्या जागतिक आइमैक्स रिलीजची घोषणा केली आहे. ही बहुप्रतिक्षित फिल्म १४ ऑगस्ट २०२५ रोजी भारत, उत्तर अमेरिका, मिडल ईस्ट, यूके व युरोप, ऑस्ट्रेलासिया, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशिया मध्ये आइमैक्स थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
वॉर २ हा वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा पुढचा धमाकेदार भाग आहे, ज्यामध्ये आधीपठान , टाइगर 3 आणि वॉर यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. पठान हा भारतीय आइमैक्स बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
रिलीजला ५० दिवस बाकी असताना, वायआरएफ ने हृथिक रोशन , एनटीआर ., आणि कियारा आडवाणी यांचे खास आइमैक्स पोस्टर रिलीज केले.
“आम्ही भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत,” असं वायआरएफ चे इंटरनॅशनल डिस्ट्रीब्यूशन व्हाईस प्रेसिडेंट नेल्सन डिसूझा म्हणाले. “वॉर २ ही स्पाय युनिव्हर्समधील एक ऐतिहासिक घटना आहे. हृथिक आणि एनटीआर यांचं आमनेसामने युद्ध आइमैक्स वर पाहणं म्हणजे एक अद्वितीय अनुभव ठरणार आहे.”
आइमैक्स चे इंटरनॅशनल व्हाईस प्रेसिडेंट क्रिस्टोफर टिलमॅन म्हणाले, “आदित्य चोपड़ा आणि अयान मुखर्जी यांनी एक थरारक अॅक्शन सिनेमा साकारला आहे, आणि आइमैक्स हे या सिनेमासाठी परिपूर्ण माध्यम आहे.”
अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर २ मध्ये जबरदस्त अॅक्शन, अविश्वसनीय दृश्य आणि उत्कंठावर्धक अनुभव पाहायला मिळेल – खास आइमैक्स साठी डिझाइन केलेला.
याचं खास आइमैक्स टीझर आधीच जगभरात थिएटर्समध्ये प्रदर्शित होऊ लागलं आहे. १४ ऑगस्ट २०२५, संपूर्ण अनुभवासाठी फक्त आइमैक्स मध्ये भेट द्या.