ऑस्कर पुरस्कार विजेती केट ब्लॅन्शेटसोबत सोनम कपूरचा ग्लॅमरशस जलवा सर्पेन्टाईन समर पार्टीत; आफ्टर पार्टीची ही यजमान
बॉलीवूड अभिनेत्री आणि आंतरराष्ट्रीय फॅशन आयकॉन सोनम कपूरने काल लंडनमधील सर्पेन्टाईन समर पार्टीत आपल्या आगळ्या स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधले. सोनम यांना या पार्टीच्या होस्ट कमिटीचा सन्मान मिळाला. त्यांनी प्रसिद्ध भारतीय चित्रकार अर्पिता सिंग यांच्या "रिमेंबरिंग " या प्रदर्शनाला भेट दिली.
या निमंत्रणावर आधारित फंडरेझर पार्टीचे सह-आयोजन ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री केट ब्लॅन्शेट यांनी केलं होतं. कला, फॅशन, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना एकत्र आणण्याचा हा उपक्रम होता.
डिओर ब्रँडची जागतिक ब्रँड अॅम्बेसडर असलेल्या सोनम कपूरने डिओर फॉल 2025 कलेक्शनमधील एक आकर्षक किमोनो जॅकेट घालून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ईशा अंबानी, ईझा गोन्झालेझ, एलिसिया विकेंडर, रिबेल विल्सन, जॉर्जिया मे जैगर, लेडी अमेलिया स्पेन्सर, लेडी एलिझा स्पेन्सर आणि लिली अॅलन यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटी ही उपस्थित होत्या.
या मुख्य इव्हेंटनंतर, सोनम कपूरने सर्पेन्टाईन ट्रस्टी यूजेनियो लोपेझ अलोन्सो यांच्या सोबत आफ्टर पार्टी यजमान म्हणून ही भूमिका निभावली. यावेळी त्यांनी गिवेंची ब्रँडचा संपूर्ण लूक साकारला — एक काळ्या रंगाचा लेदर ट्रेंच कोट जो सारा बर्टनच्या पॅरिस डेब्यू कलेक्शनमधून होता.