‘त्रुटीपूर्ण, अपूर्ण लोकच खऱ्या आणि परिपूर्ण प्रेमकथांचा भाग असतात!’ : मोहित सूरी
यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी यांची सैयारा ही सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ही एक अशी प्रेमकथा आहे जिथे दोन्ही पात्र परिपूर्ण नाहीत, पण एकमेकांच्या सहवासात ती परिपूर्ण वाटू लागतात.
मोहित सूरी म्हणतो ,“अपूर्ण, चुका करणाऱ्या लोकांमध्येच खरी प्रेमकथा असते. अशा प्रेमकथा खरी वाटतात, जवळच्या वाटतात. सैयारा मध्येही असाच एक अनुभव देण्याचा प्रयत्न आहे.”
20 वर्षांपासून रोमँटिक सिनेमाचं दिग्दर्शन करणारे मोहित पुढे सांगतात,“चांगली प्रेमकथा तीच असते ज्यात संघर्ष असतो, वेदना असते. जर सर्व काही सहज असेल, तर त्या कथेला खोलपणा नसतो. सैयारा मध्ये तो भावनिक थर आहे – निरागस पण गुंतागुंतीची प्रेमकथा.”
आहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्याबद्दल मोहित म्हणतो,“ते दोघंही वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे आहेत, वेगवेगळी मूल्यं घेऊन आलेले. त्यांचं आयुष्य अजून नीट स्थिर नाही, पण एकमेकांसोबत ते परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करतात. अशीच प्रेमकथा मला दिग्दर्शक म्हणून सांगायची आहे.”
सैयारा या नावाचा अर्थ म्हणजे भटकता तारा – असा तारा जो सतत चमकतो, मार्ग दाखवतो, पण नेहमी थोडासा दूरच असतो.
हा चित्रपट18 जुलै 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. अहान पांडे ह्या चित्रपटातून डेब्यू करत आहे, तर अनीत पड्डा ला बिग गर्ल्स डोंट क्राई मधील भूमिकेसाठी ओळखले जाते.
50 वर्षांच्या इतिहासात वायआरएफ ने अनेक गाजलेल्या प्रेमकथा दिल्या आहेत आणि आता मोहित सूरीसह ही जोडी सैयारा ने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारी कथा घेऊन येते आहे.