Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

‘हृतिक रोशन आणि एनटीआर यांच्यातील टक्कर घडवण्यासाठी कथानक तयार करण्यात सर्वाधिक वेळ गेला!’ : अयान मुखर्जी

 ‘हृतिक रोशन आणि एनटीआर यांच्यातील टक्कर घडवण्यासाठी कथानक तयार करण्यात सर्वाधिक वेळ गेला!’ : अयान मुखर्जी


यशराज फिल्म्स चा वॉर 2, अयान मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला , हा  2025 मधील सर्वात जास्त उत्सुकता असलेली फिल्म आहे. आदित्य चोप्रा यांनी निर्मिती केलेला हा भव्य पॅन-इंडिया अ‍ॅक्शन स्पेक्टॅकल, यशराज फिल्म्सच्या फेमस वायआरएफ स्पाई यूनिवर्स  मधील सहावा भाग आहे, ज्यात आतापर्यंत फक्त ब्लॉकबस्टर चित्रपटच आले आहेत. अयानने उघड केलं की त्यांनी पूर्ण लक्ष वॉर 2 च्या कथानक तयार करण्यातच केंद्रित केलं, कारण त्यांना हृतिक रोशन आणि एनटीआर या दोन दिग्गजांना भिडवण्यासाठी एक तितकंच मोठा संघर्ष हवा होता .


अयान म्हणाला ,“वॉर २ सारख्या एका अतिशय लोकप्रिय फ्रँचायझीला पुढे नेणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि त्यावर स्वतःची छाप सोडणंही. वॉर 2 चे दिग्दर्शन करणं हा माझ्यासाठी एक सुंदर संधी होती, जिथे मी पहिल्या चित्रपटाला सलाम करू शकलो. जर असं नसलं, तर अशा ब्लॉकबस्टर फ्रँचायझीमध्ये काम करण्याचा काही उपयोग नाही. दिग्दर्शक म्हणून मी प्रामाणिकपणे सांगतो की, मी स्वतःला पूर्णपणे यात बुडवून टाकलं आहे, कारण प्रेक्षकांना एक नवीन मार्ग देणं गरजेचं आहे — जी त्यांना आणखी हवं असे  वाटेल.”



तो  पुढे म्हणतो , “वॉर  2 मधील प्रत्येक गोष्ट खूप नियोजनपूर्वक तयार करण्यात आली आहे, जेणेकरून प्रेक्षकांचा थिएटरमधील अनुभव अधिक भव्य आणि थरारक होईल. सर्वाधिक वेळ आम्ही अ‍ॅक्शन सीन्स आणि कथानक — विशेषतः संघर्ष — तयार करण्यात घालवला, जो हृतिक रोशन आणि एनटीआर यांच्यातील आमनेसामनेच्या भिडंतीस योग्य न्याय देईल.”


अयान मानतो की वॉर 2 हा एक चित्रपट नसून भारतीय सिनेमाची ताकद साजरी करणारा एक महोत्सव आहे, कारण तो हृतिक आणि एनटीआर यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांना एकत्र आणतो आणि एक असा थरारक अनुभव देतो, जो प्रेक्षकांची श्वास रोखून धरतो.


अयान म्हणतो ,“वॉर 2 हे खरं तर भारतीय सिनेमाचं एकत्र येणं आहे, जिथे हे दोन दिग्गज कलाकार एकत्र येत आहेत. आम्हाला माहीत होतं की या जोडीविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड अपेक्षा असतील आणि आम्ही प्रत्येक सेकंद याच विचारात घालवला की, प्रेक्षक जेव्हा थिएटरमध्ये बसतील, तेव्हा त्यांना आयुष्यातील सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभव कसा देता येईल.”


वॉर 2 हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.