‘वॉर 2 चं मुळातलं गाभा म्हणजे एक शक्तिशाली आणि नाट्यमय कथा’ : अयान मुखर्जीचं टीझरनंतर भावनिक वक्तव्य
वायआरएफ च्या स्पाय युनिव्हर्स मधील बहुप्रतिक्षित चित्रपट वॉर 2 चा टीझर सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अयान मुखर्जी ने या चित्रपटाबद्दल पहिल्यांदाच एक भावनिक आणि प्रामाणिक पोस्ट शेअर केली आहे.
📲 अयान मुखर्जी चा इंस्टाग्राम पोस्ट - https://www.instagram.com/p/DJ_B65cs0FG/?igsh=MXVpaDN1OW14czl5eA==
अयान लिहितो : “ही केवळ एक मेगा अॅक्शन फिल्म नाही, तर तिचं मुळातलं गाभा म्हणजे एक जबरदस्त कथा — जिचं स्क्रिप्ट मी प्रथम ऐकलं तेव्हा अक्षरशः थक्क झालो. ती कथा साकारताना जो आनंद आणि आव्हान दोन्ही अनुभवले, तो माझ्यासाठी खास होता.”
तो पुढे म्हणतो: “आजवर स्पाय युनिव्हर्सने भरपूर अॅक्शन दिलं आहे, पण वॉर 2 मध्ये त्या अॅक्शनसोबत एक भावनिक खोली देखील आहे, जी प्रेक्षकांना एका नवीन सिनेमेटिक अनुभवात घेऊन जाईल.”
अयान ने विशेष उल्लेख केला आहे त्यांच्या टीमचा, आदित्य चोप्रा यांचं मार्गदर्शन आणि सुपरस्टार्स ऋतिक रोशन व एनटीआर यांच्या मेहनतीबद्दल.
“या दोन प्रचंड मोठ्या कलाकारांबरोबर काम करताना मी प्रचंड काही शिकलो आहे. त्यांच्या अभिनयात फक्त स्टार पॉवर नाही, तर पात्रांच्या खोल भावनांनाही त्यांनी अप्रतिम पद्धतीने उतरवलं आहे.”
कियारा अडवाणी विषयी बोलताना ते म्हणाला ,“कियारा ही माझी जवळची मैत्रीण असून, तिचं पात्र चित्रपटात एक उत्साहाचा झरा आहे.”
वॉर 2 १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट वायआरएफ स्पाय युनिव्हर्स मधील सहावा भाग आहे.