‘जमाई नं.1’ साठीच्या एका वन–टेक भावनिक दृश्यामध्ये सिमरन कौरला कोसळले रडू
झी टीव्हीवरील लोकप्रिय नाट्य ‘जमाई नं.1’ आपल्या हाय–व्होल्टेज कथानक आणि भावनिकदृष्ट्या भरलेल्या क्षणांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता एका नवीन टि्वस्टमध्ये हे कथानक आणखी एक नाट्यमय वळण घेत असून नील (अभिषेक मलिक) ला सायली (सोनल वेंगुर्लेकर) ने दाखल केलेल्या धक्कादायक छेडछाडीच्या गुन्ह्यासाठी चुकून अटक करण्यात येते. त्या सगळ्या गोंधळात नीलच्या समर्पित पत्नी रिद्धीची भूमिका करणाऱ्या सिमरन कौरने आपल्या पतीचा निरागसपणा सिद्ध करण्यासाठी आणि सत्य उघडकीस आणण्यासाठी अतिशय शक्तीशाली आणि हृदय पिळवटून टाकणारा अभिनय केला.
ह्या दृश्याला सिमरनच्या वास्तविक भावुकपणाने खरोखरीच वेगळे बनवले. आपल्या प्रेमासाठी उभ्या असलेल्या स्त्री चा असहाय्यपणा, क्रोध आणि अगतिकता दर्शवण्यासाठी सिमरनने आपल्या भावविश्वात खोल उडी मारली. हे भावनिक दृश्य केवळ एका टेकमध्ये चित्रीत करण्यात आले. अशा प्रकारच्या दृश्यासाठी ही दुर्मिळच गोष्ट आहे कारण अशा दृश्यांसाठी प्रचंड असुरक्षिततेची भावना आणि भावनिक खोलीची गरज भासते. अभिनयासाठी आपल्या मेथॉडिकल दृष्टीकोनासाठी मानल्या जाणाऱ्या सिमरनने एकांतात तयारी केली आणि आपल्या व्यक्तिरेखेच्या भावनिक द्वंद्वाला जाणून घेण्यासाठी स्वतःला एका खोलीत डांबून घेतले आणि ह्या दृश्याबद्दल खोलात जाऊन विचार केला.
सिमरन म्हणाली, “ज्याक्षणी मी कथानक वाचले, मला ठाऊक होते की हे दृश्य आव्हानात्मक आणि तरीही खास असणार आहे. मला त्याचा केवळ अभिनय करायचा नव्हता. माझ्या व्यक्तिरेखेला काय वाटत असेल हे मला जाणून घ्यायचे होते. ते सोपे नव्हते. दृश्याचे चित्रीकरण करण्याआधी मी स्वतःला खोलीत डांबून घेतले, माझी स्क्रिप्ट वाचली, शांतपणे बसले आणि स्वतःला परिस्थितीचे गांभीर्य समजून घेऊ दिले. आपले ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्यावर अशा प्रकारचा भयंकर गुन्हा दाखल केल्यानंतर आपल्याला कसे वाटेल हे मी जाणून घेतले. त्या परिस्थितीवर आपले काहीच नियंत्रण असू शकत नाही. तेव्हाच भावनिकदृष्ट्या मला उध्वस्त झाल्यासारखे वाटले आणि मी त्या दृश्यामध्ये स्वतःला वाहून घेतले. मला आनंद आहे की टीमने केवळ एका टेकमध्ये ते दृश्य छान टिपले. एक कलाकार म्हणून अशा प्रकारचे क्षण तुमच्या मर्यादांची परीक्षा घेतात आणि तुम्हांला प्रचंड समाधानही प्रदान करतात.”
सिमरनच्या जबरदस्त अभिनयाने ‘जमाई नं.1’ मध्ये सच्चाईचा आणखी एक स्तर आणला त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांनी आता पाहायलाच हवी. आगामी भागांमध्ये हे पाहणे प्रेक्षकांसाठी रोचक ठरेल की नीलच्या नावावरील हा डाग पुसण्यासाठी रिद्धी कशी लढेल. सत्य उघडकीस आणण्यामध्ये ती यशस्वी होईल की सायली आणि कांचन (पापिया सेनगुप्ता) ह्या या जोडीमध्ये दरी निर्माण करण्यात यशस्वी होतील?
तेव्हा पाहायला विसरू नका ‘जमाई नं.1’ दररोज रात्री 11 वाजता फक्त झी टीव्हीवर