*अशोक मामांसमोर येणार का अनिश - भैरवी च्या Contract Marriage चे सत्य?*
*पहा अशोक मा.मा. सोम ते शनि रात्री ८.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर!*
*मुंबई २८ मे, २०२५ :* कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका अशोक मा.मा. मध्ये सध्या एकामागोमाग एक धक्कादायक वळणं येताना दिसत आहेत. अर्जुन बेलवलकरच्या एन्ट्रीनंतर मालिकेत हास्याचा तडका आणि उत्सुकता यांचा उत्तम मिलाफ पाहायला मिळतो आहे. अशोक मामा मालिकेत अर्जुन बेलवलकर ची एंट्री झाल्यापासून बऱ्याच मजेशीर घटना घडत आहेत तर त्याचं पात्रांशी असलेलं नातं देखील खुलतं चालेल आहे जे प्रेक्षकांना आवडत आहे. मग ते मामा आणि त्याच्यातील असो वा मुलांचे आणि त्याचे असो. राधा आणि किश्या ची फिरकी घेण्याची संधी देखील त्याने सोडली नाहीये. पण, आता मात्र मालिकेत एक अनोखे वळण येणार आहे ज्यामुळे अनिश - भैरवी आणि मामाच्या नात्यात काय बदल होतील हे हळूहळू कळेलच.
मात्र आता कथानकाला एक गंभीर वळण मिळताना दिसतंय. भैरवी, जी सध्या अनिशसोबत लग्नाच्या निर्णयावर संभ्रमात आहे, अर्जुनकडे सल्ला मागते. पण जेव्हा ती अर्जुनला contract marriage बद्दल सांगते, तेव्हा तो हादरून जातो. “याचा अर्थ?” असा प्रश्न विचारताच भैरवी सर्व सत्य उघड करते.भैरवी त्याला contract marriage चे सत्य सांगते. आता हे सत्य अशोक मामांसमोर येणार का ? आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते अशोक मामांच्या प्रतिक्रिया कशा असतील याकडे. हे सत्य त्यांच्यासमोर उघड होणार का? आणि झालंच तर मग मामा काय भूमिका घेणार? हे जाणून घेण्यासाठी पहा अशोक मा.मा. सोम ते शनि रात्री ८.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर!