*बालविवाहाच्या नावाखाली चाललेली सौदेबाजी : ‘कबूल है?’ एक धक्कादायक तेलुगू वेब सिरीज आता मराठीत पहा अल्ट्रा झकास ओटीटीवर...*
*मुंबई, 21 मे २०२५ :* अल्ट्रा झकास मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्या प्रेक्षकांसाठी एक अंतर्मुख आणि अस्वस्थ करणारी वेब सिरीज घेऊन येत आहे , ‘कबूल है?' ज्याचे दिग्दर्शन उमैर हसन, फैझ राय, प्रणव रेड्डी यांनी केले आहे. ही वेब सिरीज २३ मे २०२५ पासून विशेषतः मराठी भाषेत अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. या आधी ही सिरीज तेलुगू भाषेत प्रदर्शित झाली होती तेव्हा तिला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.
‘कबूल है?’ ही कथा आहे हैदराबादजवळील तलाबकट्टा भागातील, जिथे दैनंदिन जीवनात गरिबी, अशिक्षा आणि सामाजिक विषमता यांचं वास्तव अनुभवायला मिळतं. या परिसरात राहणारा एक गरीब बाप आपल्या केवळ १२ वर्षांच्या अमीना नावाच्या निष्पाप मुलीचं लग्न एका श्रीमंत आणि वृद्ध व्यक्तीसोबत लावतो. परिस्थितीने विवश झालेल्या या कुटुंबाचा निर्णय जरी त्यांच्या दृष्टीने कठीण असला, तरी त्यामागचं शोषण आणि बालहक्कांवरचा घाला हळूहळू उघड होत जातो. या पार्श्वभूमीवर, तलाबकट्टा पोलीस स्टेशनमध्ये भानू नावाच्या एका तरुण आणि न्यायप्रिय पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती होते. भानू हा फक्त कायद्याचाच नव्हे, तर मानवतेचाही प्रहरी आहे. तो आपल्या तपासामध्ये मुलांची तस्करी, बालविवाह, बेकायदेशीर टोळ्यांचा वावर आणि पोलिस यंत्रणेमधील भ्रष्टाचार अशा अनेक धोकादायक गोष्टी समोर आणतो.
‘कबूल है?’ ही केवळ एका मुलीची गोष्ट नाही, तर हजारो अमीनांची व्यथा मांडणारी एक समाजाला काळिमा फसणारी कथा आहे. ही मालिका बालविवाह, लिंगभेद, गरिबी आणि समाजातील शोषणाच्या वेगवेगळ्या छटांवर प्रकाश टाकते. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले की, "या कथा मनात खोलवर परिणाम करतात आणि सामाजिक जनजागृती करतात. या सिरीजच्या माध्यमातून अल्ट्रा झकास पुन्हा एकदा अशा विषयांना व्यासपीठ देण्याच्या आपल्या बांधिलकीला अधोरेखित करत आहे."
अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट ग्रुप हे गेली चार दशके भारतीय मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य राहिले आहे. व्हीएचएसच्या काळापासून आजच्या ओटीटी युगापर्यंतचा प्रवास त्यांनी जपलेला आहे. त्यांच्या १५० हून अधिक यूट्यूब चॅनेल्स आणि तीन प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे अल्ट्रा आजही स्थानिक भाषिक कंटेंटसाठी एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म बनले आहे.
अल्ट्रा झकास मराठी ओटीटी आपल्याला ४,०००+ तासांच्या समृद्ध कंटेंटसह भावनिक, सर्जनशील आणि दर्जेदार मनोरंजनाचं व्यासपीठ देत आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांबरोबरच यूएसए, यूके, मिडल ईस्ट आणि आफ्रिकेतही अल्ट्रा झकास मराठी ओटीटीचं प्रेक्षकांशी असलेलं भावनिक नातं अधिक घट्ट होत आहे. आणि याचं प्रमाण म्हणजे ८०% हून अधिक व्ह्यूअर रिटेन्शन रेट.