Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*'सितारे ज़मीन पर'मधील पहिले गाणे 'गुड फॉर नथिंग' प्रदर्शित; आमिर खान बनले कोच गुलशन!*

 *'सितारे ज़मीन पर'मधील पहिले गाणे 'गुड फॉर नथिंग' प्रदर्शित; आमिर खान बनले कोच गुलशन!* 


'तारे ज़मीन पर' या २००७ मध्ये आलेल्या हृदयस्पर्शी सुपरहिट चित्रपटाच्या स्पिरिच्युअल सिक्वल ‘सितारे ज़मीन पर’च्या धमाल आणि मनोरंजनाने भरलेल्या ट्रेलरनंतर आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं पहिलं गाणं 'गुड फॉर नथिंग' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ट्रेलरप्रमाणेच या गाण्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 


या गाण्यात आमिर खान कोच गुलशनच्या भूमिकेत बास्केटबॉल टीमला ट्रेनिंग देताना दिसत आहेत. ‘गुड फॉर नथिंग’ हे गाणं प्रेक्षकांना एक धमाल अनुभव देणारं आहे, ज्यामध्ये कोच गुलशनचे एनर्जेटिक ट्रेनिंग, मुलांची मस्ती, मजा, मेहनत आणि सकारात्मक भावना एकत्रितपणे दाखवण्यात आली आहे. हे गाणं चित्रपटाच्या मजेदार फॅमिली एंटरटेनरच्या टोनला सेट करतं आणि रिलीजसाठीच्या अपेक्षांना उंचावतं.


‘गुड फॉर नथिंग’मध्ये शंकर महादेवन आणि अमिताभ भट्टाचार्य यांचा मजेशीर आणि जोशपूर्ण आवाज आहे. गिटारवर नील मुखर्जी आणि बासवर शेल्डन डी’सिल्वा यांनी साथ दिली आहे त्यामुळे या गाण्याला वेगळीच उंची मिळाली आहे.



[गाणं पाहा:](https://youtu.be/NPxjc3_PtQU?si=bDHE0Xo3OHhAztqG)

[इंस्टाग्राम लिंक:](https://www.instagram.com/reel/DJ8dLfJSkGO/?igsh=MW94MmQ3YjlvZjhtYw==)


आमिर खान प्रोडक्शन्स अभिमानाने सादर करत आहे १० उदयोन्मुख तारे: आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर.


‘शुभ मंगल सावधान’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना आता 'सितारे ज़मीन पर'साठी आमिर खान प्रोडक्शन्ससोबत मोठ्या कोलॅबोरेशनसह परत येत आहेत.आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित 'सितारे ज़मीन पर' २० जून २०२५ रोजी केवळ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


आमिर खान आणि जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकांमध्ये असलेल्या या चित्रपटात वरील १० नवोदित कलाकार झळकणार आहेत. गीतकार अमिताभ भट्टाचार्य, संगीतकार शंकर-एहसान-लॉय, पटकथा दिव्य निधी शर्मा यांची असून, निर्मिती आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भागचंदका यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.