Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*आई तुळजाभवानीचे कवडीमध्ये वास्तव्य !*

 *आई तुळजाभवानीचे कवडीमध्ये वास्तव्य  !* 

*आई तुळजाभवानी सोम ते शनि रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर.*  



 *मुंबई १६ मे, २०२५ :* कलर्स मराठीवरील लोकप्रिय पौराणिक मालिका आई तुळजाभवानी दिवसेंदिवस अधिक गूढ, आध्यात्मिक आणि भावनिक वळण घेते आहे. येत्या आठवड्यात मालिकेत आई तुळजाभवानीने एक विलक्षण रूप घेतलं असून, ती कवडीच्या माध्यमातून भक्तांशी संवाद साधताना दिसते आहे. या घडामोडी मागचं कथानक अत्यंत गूढ आध्यात्मिक संदेशाचे सर्वसामान्य प्रेक्षकांना कळेल असे सादरीकरण करते आहे, मुळात असुरांचे निर्दालन एका क्षणात करता येत असताना दैवी शक्तीची रचना अशी काय होती, ज्यामुळे देवांच्या अवतारांनाही असुरांचा शेवट करणे आव्हानात्मक ठरले.त्याची रुपकात्मक श्वास खिळवून ठेवणारी कथा मालिकेत उलगडते आहे. देवी तिच्या ईश्वरी शक्तींचा वापर करत असुर महिषासुरासमोर प्रकट होते. मात्र, ही लढाई केवळ एका असुराशी नसून, असुरी वृत्तीशी आहे जी भक्तांमध्येही दडलेली असू शकते.हा देवीच्या मनात आदिशक्तीने रुजवलेला विचार या कथानकाला अनपेक्षित कलाटणी देतो.देवीचे वास्तव्य अचानक एका कवडीत दिसते, या कवडीची निर्मिती कशी झाली  . आता नक्की पुढे काय होणार ? कवडी मध्ये देवीने वास्तव्य केल्यानंतर मालिकेत नक्की काय घडणार ? असुरांचा नाश करण्यासाठी उचलेले हे पाऊल नक्की कुठे घेऊन जाणार आहे. जाणून घेण्यासाठी पहा आई तुळजाभवानी सोम ते शनि रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर. 



आंब्याच्या चिकटलेल्या कवडीतून देवीच्या  “ही फक्त तुझीच परीक्षा नाही, तर माझ्या भक्तांचीही आहे.”  ‘सत्याचा आणि धर्माचा विजय करण्यासाठी नव्या रूपात एक नवीन अध्याय सुरू होत आहे.’ या वाक्यांनी   कथानकाची गूढता आणखी गडद झाली असून, देवीचा कवडीतील निवास आणि तिचा स्वरूप बदल, प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव घेऊन आला आहे. हे रूप म्हणजे देवीच्या ‘सर्वव्यापी’ असण्याचं प्रतीक मानलं जाते आणि आजही दरवर्षी  देवीची पालखी आमराईत दाखल होते. 



आई तुळजाभवानी मालिकेच्या  VFX साठी CG पाइपलाइन आणि Unreal Engine चा वापर केला जात आहे. हा टप्पा निर्मिती प्रक्रियेमध्ये एक नवे पर्व घडवणारा आहे. कारण त्यामुळे अधिक गतीने, अधिक परिणामकारक आणि उच्च दर्जाचे दृश्‍य अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतात. Unreal engine च्या वापरामुळे उच्च दर्जाचे ग्राफिक्स निर्माण करता येते. ही पद्धत सध्या टेलिव्हिजनसारख्या माध्यमात फारशी वापरली जात नाही.  त्यामुळे ही एक 'next-level' पायरी म्हणता येईल. या मालिकेद्वारे अत्याधुनिक VFX चा वापर मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच होत आहोत. आई तुळजाभवानीचे  कवडीतले वास्तव्य  जवळपास ३  ते ४  दिवस दिसणार आहे. 


ग्राफिकल कवडी तयार करण्यासाठी मुळातच ३० ते ४८ तास लागले. प्रत्येक भागात ‘कवडी’सारख्या व्हिज्युअल एलिमेंटसाठी तब्बल १२ तासांची मेहनत घेतली जाते, कारण त्या कवडीत देवीचे रूप दिसणार आहे आणि ती कवडी फिरणारसुद्धा आहे. हे दृश्य केवळ तांत्रिकदृष्ट्या नाही, तर भावनिकदृष्ट्याही प्रेक्षकांना भारावून टाकणारे असेल.देवीच्या अलौकिक रूपबदलाचे दर्शन असेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.