*प्रेम जिंकेल की नियती ? इंदू, अधू आणि गोपाळ यांच्या नात्यांची कसोटी!*
*इंद्रायणी मालिकेचे ४०० भाग पूर्ण!*
पहा इंद्रायणी सोम ते शनि संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
*मुंबई, २१ मे २०२५ :* कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. इंद्रायणीचा वाढदिवस उत्तमरीत्या साजरा व्हावा यासाठी अधू आणि गोपाळ दोघेही इंदूसाठी खास गिफ्ट आणतात. अधूने इंदूसाठी खास गिफ्ट घेतलेच होते पण तो तिच्यासाठी खास तयार देखील झाला होता. पण या क्षणांना अनपेक्षित वळण लागते, जे मालिकेतील नात्यांच्या गुंत्यात नवे वादळ घेऊन येणार आहे. अधू इंदुला वाढदिवसानिमित्त बाहेर घेऊन गेला आणि तेवढ्यात त्यांच्या वर हल्ला झाला ज्यामध्ये इंदुला वाचवताना अधूला इजा झाली. आणि याचाच आनंदीने मोठा मुद्दा केलाआहे इतकेच नसून तिने इंदुला घराबाहेर काढण्याची तयारी देखील करते. व्यंकू महाराज इंदूची बाजू घेत तिला रोखण्याचा प्रयत्न करतात, पण इंदूने वचन पूर्ण करत प्रॉपर्टीचे कागदपत्र आनंदीच्या नावावर केले आहेत, हे सत्य सगळ्यांसमोर येते. असं असूनही व्यंकू महाराज आनंदीबाईंना एक असं मोठं सत्य सांगतात, ज्यामुळे आनंदीचं इंदुला घराबाहेर काढण्याचं व्यूहचक्र फसतं. या सगळ्यात इंदूच्या कस्टोडियन म्हणून 'विठू पंढरपूरकर' कोण आहे, हा गोंधळून ठेवणारा प्रश्न आनंदीबाईंसमोर उभा राहतो. इंदू, अधू, गोपाळ आणि आनंदीबाई यांच्यातील नातेसंबंधांचा गुंता उकलण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे गोपाळ आणि इंदूच्या नात्यात येणार गोडं वळण तर दुसरीकडे अधूच्या भावना आणि त्याचा निर्णय या साऱ्यांवर मालिका फिरताना दिसतेय. इतक्या घटना सुरु असतानाच नुकताच मालिकेने ४०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पहा इंद्रायणी सोम ते शनि संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
इंदूच्या मालकीच्या प्रॉपर्टीशी संबंधित कागदपत्रे, आनंदीबाईचे दावे आणि कागद पत्रावर तिसऱ्या व्यक्तीची लागणारी सही म्हणजेच 'विठू पंढरपूरकर' पण हा विठू पंढरपूरकर नक्की कोण आहे ? त्याचा शोध आनंदीबाई लावू शकतील का ? या रहस्यमय व्यक्तीच्या शोधामुळे मालिकेत एक वेगळाच संघर्ष निर्माण होणार आहे. हे सगळे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. व्यंकू महाराजांची मध्यस्ती, इंदूला घराबाहेर काढण्याचा आनंदीचा प्रयत्न आणि इंदूचा हक्क हे सारेच ट्विस्ट प्रेक्षकांना गुंतवून ठेवतील यात शंकाच नाहीये. दरम्यान, आनंदीबाई अधूवर प्रमिलाशी लग्नासाठी दबाव टाकताना दिसणार आहे आणि त्यामुळे अधूचा गोंधळ आणखी वाढणार आहे. आनंदी बाईंची हि मागणी, हा हट्ट अधूला नव्या पेचात टाकणार. नक्की पुढे काय घडणार? कोण उलगडेल या नात्यांचा गुंता? प्रॉपर्टीवर खरे अधिकार कुणाचे? आणि अधूचे लग्न नक्की कोणाशी होणार ?
हे सगळं जाणून घेण्यासाठी बघत राहा 'इंद्रायणी' सोम ते शनि, संध्या ७ वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर!