*‘सोहळा सख्यांचा’ कार्यक्रमातील १९ मे च्या भागात वीरपत्नींचा सन्मान आणि प्रेरणादायी प्रवास*
‘सन मराठी’वरील लोकप्रिय कार्यक्रम ‘सोहळा सख्यांचा’ हा केवळ मनोरंजनात्मक कार्यक्रम नाही , तर महाराष्ट्रातील महिलांना स्वतःला व्यक्त करण्यासाठीचं एक भावनिक आणि प्रेरणादायी व्यासपीठ ठरलं आहे. आजवर विविध क्षेत्रांतील महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होत आपल्या आयुष्यातील खास क्षण, संघर्ष, आणि यशाची गोष्ट सांगितली आहे. 'सन मराठी' वाहिनी नेहमीच प्रेक्षकांना प्रेरित करणाऱ्या कथा मालिकेद्वारे दाखवत असते. तसेच 'सोहळा सख्यांचा' या कार्यक्रमातून प्रत्येक महिला स्वतःचा प्रवास प्रेक्षकांना सांगते आणि यामधून इतर अनेक महिलांना जगण्याची एक नवीन उमेद मिळते.
नुकताच एक भाग सातारा मध्ये शूट करण्यात आला. १९ मे रोजी प्रदर्शित होणारा 'सोहळा सख्यांचा' हा भाग अगदी खास ठरला आहे याच कारण की, या भागात इतर महिलांप्रमाणेच वीरपत्नी निशा लक्ष्मण भोसले व त्यांच्यासह आणखीन एक वीरपत्नी सहभागी झाल्या आहेत. या भागात दोन वीरपत्नींचा जीवनप्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या वीरपत्नींनी आपल्या नवऱ्याच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांनीही देशसेवा करण्याचं ठरवलं. एका सैनिकाच्या कुटुंबाचं आयुष्य इतकं सोपं नाही हे खरं आहे पण तरीही संपूर्ण कुटुंबाने भारत मातेच्या संरक्षणासाठी लढण्याची जिद्द ठेवणं ही खरंच एक कौतुकाची बाब आहे. वीरपत्नी निशा लक्ष्मण भोसले त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनाही देशासाठी लढायचंय हे ध्येय ठेवून भोसले कुटुंबीय पुढे जात आहेत.
मुख्यतः 'सन मराठी' वाहिनी कडून विजेत्या वीरपत्नी निशा लक्ष्मण भोसले यांना हुकुमाची राणीचा मान देऊन त्यांची ओटी भरण्यात आली. या वीरपत्नीने नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.हा विशेष भाग प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करेल आणि त्यांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू आणणारा ठरेल. या प्रवासात त्यांनी किती व कशाप्रकारे अडचणींवर मात केली आहे हे जाणून घेण्यासाठी पाहा 'सोहळा सख्यांचा' हा कार्यक्रम १९ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता फक्त आपल्या 'सन मराठी'वर.